जागा 17, उमेदवार दोनशे, नियुक्तीसाठी पोहचलेल्या परिचारिकांचा गोंधळ

जागा 17, उमेदवार दोनशे, नियुक्तीसाठी पोहचलेल्या परिचारिकांचा गोंधळ

अकोला ः महापालिकेच्या १७ परिचरिकांच्या नियुक्तीसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयात पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. २०० पेक्षा जास्त उमेदवार असल्याने तसेच कार्यालयात गोंधळ झाल्याने रामदास पेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. (Confusion of nurses arriving for appointment by Akola Municipal Corporation)

जागा 17, उमेदवार दोनशे, नियुक्तीसाठी पोहचलेल्या परिचारिकांचा गोंधळ
कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार; डॉक्टरवर कारवाई, २५ लाखांचा औषधी साठा जप्त

पोलिसांनी महिला उमेदवारांना कार्यालय खाली करण्याचे सांगितले. मात्र, पोलिसांची या उमेदवारांशी उद्धट भाषा वापरल्याने वातावरण चिघळले. रामदास पेठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी या उमेदवारांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. तरीही उमेदवार हे जात नव्हते.

जागा 17, उमेदवार दोनशे, नियुक्तीसाठी पोहचलेल्या परिचारिकांचा गोंधळ
महानगरपालिकेच्या कर विभागात संगणक संचाची चोरी

अनेक उमेदवार यांनी पोलिसांनासमोर आपला रोष व्यक्त केला. तेव्हा पोलिस निरीक्षक गुल्हाने यांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी उमेदवार महिलांनाच आवाज कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा दम दिला. यामुळे महिला उमेदवार आणखी चिडल्या. परंतु, सर्व उमेदवारांना कार्यालयाच्या बाहेर काढल्यानंतर अनेक महिला या हळूहळू निघून गेल्या. ही प्रक्रिया रद्द केल्याने त्याही घरी गेल्या.

संपादन - विवेक मेतकर

Confusion of nurses arriving for appointment by Akola Municipal Corporation

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com