अकोला : आणखी एकाचा मृत्यू; १५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह

३४२ जणांना दिला डिस्चार्ज
Akola Corona Update
Akola Corona UpdateGoogle
Updated on

अकोला : कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा रविवारी (ता. ३०) मृत्यू झाला. त्यासोबतच १५३ नवे रुग्ण आढळले, तर ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ६५४ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्ग आरटीपीसीआर तपासणीचे रविवारी (ता. ३०) जिल्ह्यात ४८३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३५८ अहवाल निगेटिव्ह तर १२५ अहवाल पॉझिटिव्ह आले. (Akola Corona Update)

Akola Corona Update
"राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"

खासगी लॅबमध्ये ११ तर रॅपिडच्या चाचणीत १७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात रविवारी १५३ नव्या रुग्णांची भर पडली. याव्यतिरिक्त होम आयसोलेशनमधून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा मृत्यू झाला. त्यात अलायन्स लायब्ररी कॅम्पाऊंड, अकोला येथील ७९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेस २१ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सध्या जिल्ह्यात १ हजार ६५४ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात ६४ हजार २ रुग्ण आढळले आहेत, तर ६१ हजार १९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १ हजार १५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com