esakal | कोरोनाने आणखी १३ जणांचा बळी; ४०८ पॉझिटिव्ह; ७२८ जणांना डिस्चार्ज

बोलून बातमी शोधा

कोरोनाने आणखी १३ जणांचा बळी; ४०८ पॉझिटिव्ह; ७२८ जणांना डिस्चार्ज

कोरोनाने आणखी १३ जणांचा बळी; ४०८ पॉझिटिव्ह; ७२८ जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्ग तपासणीचे २००७ अहवालांमध्ये प्राप्त झाले. त्यातील १७३८ अहवाल निगेटीव्ह तर २६९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. याशिवाय रॅपिड अँटिजेन चाचणीचे १३९ रुग्ण मिळून एकूण ४०८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. संसर्ग झालेल्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या दुपट्ट असून, दिवसभरात ७२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र मृत्यूचे भय कायमच असून, जिल्ह्यात आणखी १३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण दोन लाख एक ८०५ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे एक लाख ९८ हजार ९४९ आणि फेरतपासणीचे ३८७ अहवाल आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४६९ नमुने होते. आजपर्यंत एकूण दोन लाख १ हजार ७५५ अहवाल प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा: वाढीव रेटने विकत होते कोरोना रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन , महिलेसह वॉर्ड बॉयला अटक

त्यात एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या एक लाख ७१ हजार ५०० आहे. त्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालांचही भर पडली. आज दिवसभरात २६९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १०९ महिला व १६० पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूर-दोन, अकोट-१०, बाळापूर-२५, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-६३, पातूर-२८, अकोला तालुक्यातील -१३६ (अकोला ग्रामीण-२६, अकोला मनपा क्षेत्र-११०) रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल (ता.२७) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात १३९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

१३ जणांचा मृत्यू

- तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला

-जूने शहर येथील ६८ वर्षीय पुरुष

- येळवन ता. बार्शीटाकळी येथील २९ वर्षीय महिला

- गौतम नगर येथील ८१ वर्षीय पुरुष

- बेलुरा उमरा ता.अकोट येथील ६० वर्षीय पुरुष

-चोहट्टा बाजार ता. अकोट येथील ५२ वर्षीय पुरुष

- केशव नगर येथील ८२ वर्षीय पुरुष

- एमआयडीसी नं.४ शिवणी येथील ७० वर्षीय पुरुष

- उमरी ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष

- कोळंबी ता. मूर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष

- शिवर येथील २९ वर्षीय पुरुष

-अकोट येथील ६० वर्षीय पुरुष

- शास्त्री नगर येथील ७८ वर्षीय महिला

...........................

७२८ जणांना डिस्चार्ज

बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पिटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील ११, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, यकीन हॉस्पिटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, देवसार हॉस्पिटल येथील तीन, आयकॉन हॉस्पिटल येथील सात, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पिटल येथील एक, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, अर्थव हॉस्पिटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६१५ असे एकूण ७२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

संपादन - विवेक मेतकर