कोरोनामुळे ओढावली बेरोजगारी तर येथे आहेत रोजगाराच्या संधी...वाचा

job opportunities in akola.jpg
job opportunities in akola.jpg

अकोला : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. उद्योग-व्यापार, कारखाने व वाहतुकीसह वस्तुंचे उत्पादन बंद असल्याने महामंदीची लाट उसळली आहे. या लाटेत अनेक उद्योगांना टाळे लागले आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. नोकऱ्या गेल्यामुळे लाखो नागरिकांना भविष्याची चिंता सातवत आहे. परंतु कोरोनामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. 

कोरोना आणीबाणीच्या या काळात मनलं तर मंदी नाहीतर संधीच-संधी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी कोरोनाने संधीच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. तर मग चला बघुया कोणत्या आहेत या वाटा...

मुखपट्टी निर्मिती व विक्रीचा व्यवसाय
कोरोनाचे संकट आणखी काही काळ राहणार आहे. या काळात मास्क अर्थात मुखपट्टीचा वापर सुद्धा प्रत्येक व्यक्तीला करावा लागेल. त्यामुळे विविध प्रकारच्या कपड्यांपासून मुखपट्टीच्याची निर्मिती करण्याच व्यवसाय आपण सुरू करू शकता. त्यासोबतच मेडिकल, जनरल स्टोअर्स व इतर दुकानदारांना मुखपट्ट्याचा पुरवठा करून मुखपट्ट्यांची विक्री करुन चांगला नफा मिळवू शकता. अत्यल्प भांडवल व चांगला नफा असल्यामुळे हा व्यवसाय पुढील काही महिने चांगले उत्पन्न मिळवून देईल. 

सॅनिटायझर विक्रीतून नफा
कोरोना विषाणूपासून बचावासाठी व घराबाहेर पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हात व शरीराचे इतर अवयव निर्जंतुक करण्यासाठी पुढील काही महिने सॅनिटायझरचा उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे सॅनिटायझर उपलब्ध आहेत. संधीचे सोने करण्यासाठी सॅनिटायझर विक्रीचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. स्पिरीट व कमी किंमतीत मिळणाऱ्या इतर साधणांचा उपयोग करून हा सॅनिटायझरची निर्मिती करुन हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यापासून चांगली कमाई सुद्धा होऊ शकते. परंतु त्यासाठी अन्न व औषधी प्रशासनावर इतर शासकीय परवानग्या आवश्‍यक आहेत. 

गाऊन निर्मितीत संधी
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना सुद्धा विविध प्रकारच्या साधणांची आवश्‍यकता आहे. त्यामध्ये रुग्णांना तपासणीसाठी डॉक्टर पीपीई कीटचा उपयोग करत आहेत. त्यासोबत कोरोगाग्रस्त नसलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी रुग्णसेवक मेडिकलसाठी उपयोगी कापडी गाऊनचा उपयोग करत आहेत. त्यामुळे गाऊन निर्मिती करून रुग्णालयात सेवा देणाऱ्यांना त्याची विक्री करण्याची संधी कोरोनाच्या काळात उपलब्ध झाली आहे. त्यासाठी फक्त शिवणकाम येणाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. 

‘वर्क फ्रॉम होम’ घेवून येईल पैसे
कोरोच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे भारतात ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना राबविल्या जावू शकते, याची जाणीव सर्वच कंपन्यांना झाली आहे. त्यामुळे यापूर्वी अगदी अल्प प्रमाणात घरूनच काम करण्याचा व्यवसायात यापुढे प्रचंड संधी आहेत. काही कंपन्यांनी त्यादृष्टीने काम सुद्धा सुरु केल्याने घराच बसून चांगले पैसे कमावण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. 

होम डिलेव्हरीतून अर्थार्जन शक्य
कोरोनामुळे आता प्रत्येक व्यक्ती बाजारात जाण्यास टाळत आहे. पुढील काही महिन्ये अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळ, भाजीपाला व किराणासह इतर जीवनावश्‍यक वस्तुंची होम डिलेव्हरीची सेवा देवून त्यापासून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी प्रत्येकाचे दार ठोठावत आहे. या संधीचा फायदा घेवून प्रत्येक व्यक्ती बिनभांडवली व्यवसाय सुद्धा करू शकतो. 

साखळी बनवा; पैसे कमवा
लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचा माल अडत्यांच्या माध्यमातून न विकता चौका-चौकात हातगाड्यांवर विकला. त्यामुळे दलालांची साखळी खंडित झाली व शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला. भविष्यात अशाच प्रकारची शेतकरी-विक्रेता ते ग्राहक किंवा उत्पादक-विक्रेता ते ग्राहक अशी साखळी बनवून पैसे कमावण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. 

सॅनिटायझेशन चांगला व्यवसाय
कोरोना विषाणूच्या काळात हातांना नियमित सॅनिटाईझ करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यासोबत आपले घर, कार्यालय व परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन सुद्धा करत आहेत. या स्थितीत कार्यालय, घर सॅनिटाईझ करून देण्याचा व्यवसाय सुरू केल्यास त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी भांडवल सुद्धा कमी लागत असल्याने कमी भांडवलात चांगला नफा मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com