चार तासांच्या कार्यक्रमाचा खर्च नऊ लाख रुपये |Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार तासांच्या कार्यक्रमाचा खर्च नऊ लाख रुपये
चार तासांच्या कार्यक्रमाचा खर्च नऊ लाख रुपये!

अकोला : चार तासांच्या कार्यक्रमाचा खर्च नऊ लाख रुपये

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ता. ३ मार्च २०१९ रोजी ‘डिस्ट्रीक्ट बिझनेस प्लान कॉम्पिटीशन २०१९’ हा कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता एक दिवसाच्या फक्त चार तासांच्या कार्यक्रमाचा खर्च तब्बल नऊ लाख रुपये दाखूवन रक्कम काढण्यात आल्याचे माहिती अधिकार मागविलेल्या माहितीतून उजेडात आले आहे. या संबधी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये दोषीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या तालुक्यात जेवणावळी

अकोला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यास आले होते. या कार्यक्रमाचे बिझनेस पार्टनर म्हणून नवयुवक एंटरप्रायजेस, मुंबईचे संचालक देवांग दवे व गौरव मिश्रांसह त्यांचे इतर तीन साथीदार यांनी संपूर्ण कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी घेतलेली होती. यामध्ये सोबत ई-प्राईम इंटरटेनर, नवयुवक इंटरप्राईजेसद्वारा ईगल सेक्युयरिटी मुंबई आयोजन भागीदार अशी त्यांची मुख्य भूमिका होती. मुंबईचे स्थायिक असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजनाला लागणारे साहित्य, जेवण व्यवस्था व इतर कामे अकोला शहरातील नामवंत व्यावसायीकांकडून करून घेतले. यात डिजीटल नेटवर्क यां संस्थेकडून वरील उल्लेखील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी जाहिरात, छपाई, हॅन्डबील तयार करणे, होर्डींग, बॅनर्स लावणे, स्वागत गेट तयार करणे, लावणे व काढणे ईत्यादी कामे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांचे नावाने करून घेण्यात आली.

हेही वाचा: उंड्री : सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखाला लुटले

डिजीटल नेटवर्कचे संचालकांना तुमच्या नावाने आर्डर असल्याचे सांगून देयकेसुध्दा घेतले व देयके मिळाल्याची पावती देण्यात आली. या कार्यक्रमाकरिता संबंधितांनी डिजीटल नेटवर्ककडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे नावाने कोटेशन घेतले ते पास झाले. त्यानुसार कार्यारंभ आदेश देण्यात आले असे सांगितले. कार्यक्रम पार पडल्यानंतर देयकाची ता. ४ मार्च २०१९ रोजी प्रत सुध्दा घेतली आहे. त्यावर त्यांचे प्रतिनिधी देवेश यांची ता. ४ मार्च २०१९ रोजी केलेली स्वाक्षरी सुध्दा आहे. परंतू पेमेंटकरिता सतत गौरव मिश्रा व देवांग दवे यांना पाठपुरावा केला असता कोविड-१९ व लॉकडाउनचे कारण समोर केले.

माहितीच्या अधिकारातून हेराफेरी उघड दोन वर्षांपासून देयके निघत नाही म्हणून डिजीटल नेटवर्कचे संचालक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारांतर्गत रितसर माहिती मिळविली. या माहिती प्राप्त झाल्यानंतर देयके आणि कोटेशनच्या फाईलमधून काढून संगनमत करून हेराफेरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

काम एकाला, देयक दुसऱ्याला! डिजीटल नेटवर्कच्या देयकाच्या ठिकाणी इतर संस्थेचे ईगल सुक्युरिटी या नावाचे देयक व कोटेशन सादर केले. याच कंपनीच्या नावाने दोन लाख ९९ हजार रुपये ता.२६ एप्रील २०१९ रोजी रक्कम वळवती केली. त्यामुळे डिजीटल नेटवर्क संचालकांना संबधित कार्यालयात संस्थेने फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्या बाबत सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन अकोला येथे रितसर तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी शासकीय कार्यालयात माजी मंत्र्यांच्या वजनाने अधिकारी यांना अंधारात ठेवून देयक व दरपत्रक, कामाचे आदेश अशा महत्त्वाच्या कागदांची फेररफार करणे तसेच फसवणूक करण्यात आल्याचे आढळून आल्याने या प्रकरण गुन्हा दाखल कण्याची प्रक्रीया सुरू आहे.

loading image
go to top