लाचखोर पोलिसाला अटक; तीन शिपाई फरार

अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आसेगाव पोलिस ठाण्यातील चार पोलिसांविरोधात अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कारवाई
crime news police arrested while taking Bribe Three escaped akola
crime news police arrested while taking Bribe Three escaped akolaesakal

वाशीम : अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आसेगाव पोलिस ठाण्यातील चार पोलिसांविरोधात अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी (ता. १६) कारवाई केली. यातील गणेश बर्गे याला ताब्यात घेण्यात आले असून तीन शिपाई फरार झाले आहेत. गणेश बर्गेवर याआधी निलंबनाची कारवाई झाली होती. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी २७ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अमरावती येथे पोलिस स्टेशन आसेगाव येथील पोलिस कर्मचारी गणेश बर्गे हा दारू व जुगाराचा धंदा सुरू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार दिली.

३० मे रोजी शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता तक्रारदरास दारू व जुगाराचा धंदा सुरू ठेवण्यासाठी पोलिस शिपाई दिनेश राठोड व रमेश चव्हाण यांनी गणेश बर्गे याच्या वतीने एकूण १० हजार लाचेची मागणी करून रक्कम स्वतः स्वीकारण्याची संमती दर्शवली. तसेच शिपाई केदारेश्वर याने तक्रारदारास अवैध धंदा सुरू करून बिट जमादाराच्या मार्फतीने ठाणेदारांना भेटण्याकरिता तगादा लावला. तापासात आरोप निष्पन्न झाल्याने आरोपी गणेश बर्गे याला ताब्यात घेण्यात आले. तीन आरोपी फरार झाले आहेत. ही कारवाई सापळा व तपास अधिकारी अमोल कडू, पोलिस निरीक्षक शैलेश कडू, युवराज राठोड, नीलेश महिंगे, गजानन शेंडे, रोशन खंडारे, सतीश किटूकले यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com