esakal | कोरोनामुळे एकाचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे एकाचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह

कोरोनामुळे एकाचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा मंगळवारी (ता. १३) उपचार घेताना मृत्यू झाला. त्यासोबतच आठ नवे रुग्ण आढळले. पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात ४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Death of one by corona; Eight positive)

हेही वाचा: कपाशी घटली, सोयाबीन, तूर पिकांचा बोलबालाकोरोना संसर्ग तपासणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून मंगळवारी (ता. १३) (आरटीपीसीआर) ५०६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५०१ अहवाल निगेटिव्ह तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत सुद्धा तीन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांमध्ये आठ नव्या रुग्णांची भर पडली. त्यासोबतच एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तापडिया नगर, अकोला येथील ३३ वर्षीय पुरुष होते. या रुग्णास १२ जुलै रोजी दाखल केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोविड बळींची संख्या १ हजार १३१ झाली आहे.

हेही वाचा: सोयाबीनसह कपाशीचे बियाणे प्रयोगशाळेत फेल!


कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७६९७
- मृत्यू - ११३१
- डिस्चार्ज - ५६५२१
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४५

संपादन - विवेक मेतकर

Death of one by corona; Eight positive

loading image