देवेंद्र फडवणीस पोहचले कोरोना वार्डात, व्यक्त केली वाढत्या मृत्यूदरावर चिंता!

- राज्याचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक
 देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसEsakal

अकोला ः जिल्ह्यात कोरोना (Corona) संसर्गग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत असल्याने ही बाब चिंतेची आहे. या बाबींकडे डॉक्टरांसह प्रशासनाने लक्ष द्यावे असे निर्देश विधानसभेचे विरोधी पक्षनेता व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) कोरोनाच्या स्थितीच्या आढावा बैठकीत दिले. भाजपच्या आमदारांनी वैद्यकीय उपकरण व ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटी रुपये निधी दिला आहे. या निधीतून लवकरात लवकर काम सुरू करावे, असे सुद्धा फडणवीस यांनी यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले. Devendra Fadwani reached Akola's Corona ward, expressed concern over rising death rate!

राज्याचे माजी मुख्यमंंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. १६) दुपारी १२.३० वाजता जिल्हा दौऱ्यावर आले. निर्धारित कार्यक्रमाअंतर्गत महानगरात त्यांचे आगमन होताच सुरुवातीला त्यांनी कृषी नगरातील पोद्दाल स्कूल जवळील शोभादेवी गोयंका कोविड केअर सेंटरला भेट दिली.

 देवेंद्र फडणवीस
आरोग्य यंत्रणा हादरली; ‘म्युकर मासोसीस’मुळे महिलेचा झाला मृत्यू

त्यानंतर निमवाडी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारत, कोविड आयसीयू व वार्ड क्रमांक २९ ला भेट देवून कोरोना रुग्णांच्या स्थितीची माहिती घेतली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा प्रशासन व वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीचा तब्बल एक तास बंदद्वार आढावा घेतला. सदर

बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे सीईओ सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आरडीसी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, महानगरपालिका आयुक्त निमा अरोरा, डॉ. कुसूमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश नेताम, डॉ. रमेश पवार, डॉ. गुरुदासाणी, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे व इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 देवेंद्र फडणवीस
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीची घेतली माहिती

बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा तसेच विजय अग्रवाल यांनी पत्रकार तसेच साधुसंत, जैन मुनी, मौलवी यांच्यासाठी लसीकरणाची वेगळी व्यवस्था करण्याची तसेच ज्यांच्याकडे कार्ड नाही अशा नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्यासंदर्भात फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश फडणवीस यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिले.

सुपर स्पेशालिटीची केली पाहणी

कोरोना विरुद्धच्या लढाईत येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारत तयार असल्यानंतर सुद्धा त्याचा उपयोग होत नसल्यामुळे सदर इमारतीची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी फडणवीस यांनी दिली.

कोरोना वार्डात जावून घेतली माहिती

सर्वोपचार रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. त्या वार्ड क्रमांक २९, ३० व ३१ मध्ये जावून देंवेद्र फडणवीस यांनी कोरोना बाधितांच्या स्थितीचा आढावा घेतला. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांवर होण्याची शक्यता असल्याने फडणवीस बालकांच्या वार्डापर्यंत सुद्धा पोहचले व त्याठिकाणच्या स्थितीची माहिती घेतली.

समान काम समान वेतन द्या!

कोरोना बाधितांवर गत वर्षभरापासून जिव धोक्यात टाकून उपचार करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांनी वार्ड क्रमांक २९ बाहेर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच संवाद साधला. कोरोनाच्या स्थितीत काम करणाऱ्यांना समान काम असल्यानंतर सुद्धा समान वेतन मिळत नसल्याची खंत एका कंत्राटी डॉक्टराने फडणवीसांकडे व्यक्त केली. कोरोना काळात काम करणाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेत नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी सुद्धा यावेळी संबंधित डॉक्टरांनी केली.

संपादन - विवेक मेतकर

Devendra Fadwani reached Akola's Corona ward, expressed concern over rising death rate!

 देवेंद्र फडणवीस
स्वातंत्र्याच्या लढाईत राजेश्‍वरांच्या पायथ्यांशी घेतला होता ‘राजगुरुंनी’ विसावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com