Akola News : एसटीच्या विभाग नियंत्रकाला तीन महिन्यांची शिक्षा ; बुलढाणा कामगार न्यायालयाचा निकाल

राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाण्याचे विभाग नियंत्रक संदीप शरद रायलवार यांना कामगार न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. एका कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रकरणात त्यांनी केलेल्या हलगर्जी आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Akola News
Akola Newssakal

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाण्याचे विभाग नियंत्रक संदीप शरद रायलवार यांना कामगार न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. एका कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रकरणात त्यांनी केलेल्या हलगर्जी आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याविषयीचा निकाल विद्यमान कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए.जी. मगर यांनी दिला आहे.

बुलढाणा येथील तत्कालीन विभाग नियंत्रक तथा वर्धा येथील विद्यमान विभाग नियंत्रण संदीप रायलवार यांची केव्हाही या प्रकरणात अटक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळात ड्रायव्हर पदावर कार्यरत असताना भाऊराव शिरसाट यांना 2013 मध्ये बडतर्फ करण्यात आले होते. तदनंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कामगार न्यायालयात नंदा शिरसाट यांनी त्यांचे वारस म्हणून पुढे ही केस लढवली.

यात कामगार न्यायालयाने 12 नोव्हेंबर 2021 रोजी तांत्रिक दृष्ट्या ( निधनामुळे) भाऊराव शिरसाट यांना कामावर घेत त्यांच्या नोकरीतील सातत्य ठेवत, मागील वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतन देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. राज्य परिवहन महामंडळ या प्रकरणात औद्योगिक न्यायालयात गेले होते.

Akola News
Akola News : दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना बाधा; रुग्णालयात दाखल

तेथे देखील त्यांचा पराभव झाला. कामगार न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी वारस नंदा शिरसाट यांनी दाखल केलेल्या अवमान याचिका प्रकरणी कामगार न्यायालयाने बुलढाणा चे तत्कालीन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांना तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी एकत्रित शिक्षा सुनावली आहे.

त्यांना केव्हाही अटक या प्रकरणात आता होऊ शकते. बुलढाणाचे तत्कालीन विभाग नियंत्रण संदीप रायलवार हे तूर्तास वर्धा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक पदावर कार्यरत आहे. नंदा शिरसाट यांच्या वतीने ॲड. प्रमोद वर्मा तर विभाग नियंत्रक यांच्या वतीने ॲड.एस.आय. राखोंडे यांनी कामकाज पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com