Diwali Festival 2020 दिवाळीला बत्तासा नको रे बाबा!, निर्मितीलाच लागली कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 12 November 2020

दिवाळी सणासाठी लक्ष्मी पूजनात विशेष महत्त्व असलेल्या बत्तासा निर्मितीला कोरोनाची बाधा आली आहे. संग्रामपूर मध्ये भोई समाजात हा व्यवसाय गत ४० वर्षांपासून केला जात आहे. हा व्यवसाय सिजनेबल असला तरी कौशल्य विकासाचा भाग ठरणारा आहे.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) ः दिवाळी सणासाठी लक्ष्मी पूजनात विशेष महत्त्व असलेल्या बत्तासा निर्मितीला कोरोनाची बाधा आली आहे. संग्रामपूर मध्ये भोई समाजात हा व्यवसाय गत ४० वर्षांपासून केला जात आहे. हा व्यवसाय सिजनेबल असला तरी कौशल्य विकासाचा भाग ठरणारा आहे.

यांत्रिकीकरण चे युग असताना बत्तासा निर्मिती चे अद्याप तरी यंत्र बाजारात असल्याचे ज्ञात नाही. अंग मेहनत आणि हस्त कलेतुन निर्मित होणारा बत्तासा लक्ष्मी पूजनात मानाचा असतो.

साखर, पाणी आणि दूध याचे गरजेनुसार मिश्रण करून चाचणी घेऊन डब्बू आणि लाकडी काडी च्या साहायाने निर्मिती केली जाते. संग्रामपूर मध्ये गत ४० वर्षांपासून हा व्यवसाय भोई समाजाकडून केला जात आहे.

यंदा कोरोना च्या संकट पाहता ४ क्विटल बत्तासा तयार केल्याची माहिती जयराम इंगळे यांनी सकाळ सोबत बोलताना दिली. यासाठी श्रम जास्त करावे लागत असल्याने कमी प्रमाणात निर्मिती केली जात आहे. तसे पाहता या व्यवसायाला चांगली संधी आहे.

परंतु हा सिजनेबल व्यवसाय असल्याने नवीन पिढी यामध्ये येण्यास तयार होत नाही. सोबतच पारंपारिक पद्धतीचा अवलंब करून बत्तासा तयार करावा लागतो. बदल्यात लागणार खर्च काढून मजुरी इतकाच नफा शिल्लक राहत असल्याने या व्यवसायाच्या वाढीस ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात वाव दिसत नाही. भविष्यात हा व्यवसाय ग्रामीण भागातून हद्दपार होण्याची भीती ही जयराम इंगळे यांनी व्यक्त केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 News Akola : Corona hinders Battasa production