फरदळ नको रे भाऊ; गुलाबी बोंडअळी नियंत्रासाठीचा सर्वोत्तम उपाय

फरदळीचे पीक घेतल्यास पुढचा हंगाम चिंतेचा ठरू शकतो.
गुलाबी बोंडअळी
गुलाबी बोंडअळी sakal
Updated on

अकोला : यावर्षी गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात शेतकरी काही प्रमाणात यशस्वी ठरले असले तरी, फरदळीचे पीक घेतल्यास पुढचा हंगाम चिंतेचा ठरू शकतो. त्यामुळे अख्खे पीक धोक्यात घातल्यापेक्षा फरदळ गेलेली कधीही बरी.२०१७-१८ चा कापूस हंगाम गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने गाजला. जवळपास ५० ते ६० टक्के उत्पादन बोंडअळीने फस्त केले. हाती आलेला कापूसही सर्वोत्तम गुणवत्ता देऊ शकला नाही, त्यामुळे अल्पदरात तो विकून शेतकऱ्यांना हात मोकळे करावे लागले होते.

गुलाबी बोंडअळी
‘सकाळ’ कणकवली कार्यालयाचा आज वर्धापन दिन

गेल्या दोन हंगामात मात्र, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, सामाजिक संस्था व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न, नियोजन, व्यवस्थापन व उपाययोजना केल्याने गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. यावर्षी मात्र, सुरुवातीला जिल्ह्यात ७ ते १० टक्के गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होता व बहुतांश भागात दुसऱ्या वेचानंतर प्रादूर्भाव दाट झाल्याचे दिसून आले. शिवाय त्यामुळे पुढच्या हंगामातही गुलाही बोंडअळीचा प्रादूर्भाव होणार हे निश्चित मानले जात आहे. हा संभावित प्रादूर्भाव टाळायचा असेल तर, शेतकऱ्यांनी फरदळीच्या उत्पादनचा मोह टाळून, पुढील हंगाम सुरक्षित करावा, असे आवाहन कृषी विभाग, कृषी विद्यापीठाडून होत आहे.

गुलाबी बोंडअळी
मुलांसाठी आता न्युट्रिटिव्ह स्लाईस; शालेय पोषण आहारांतर्गत वाटप

बियाण्यासोबत मिळावे ‘ट्रॅप’

बीटी कपाशीवर सुद्धा गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, तो टाळण्यासाठी बीटी बियाण्याच्या ४५० ग्रॅम थैलीसोबत दोन कामगंध सापळ्यांचा संच बियाणे कंपनीद्वारे शेतकऱ्यांना मोफत मिळावा यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

गुलाबी बोंडअळी
मुलांसाठी आता न्युट्रिटिव्ह स्लाईस; शालेय पोषण आहारांतर्गत वाटप

असे करा नियोजन

  1.  कपाशी पिकाचे अवशेष तत्काळ नष्ट करा, पऱ्हाटीचे ढीग शेतात न ठेवता, कुट करून कंपोष्टसाठी वापरा.

  2.  हंगाम संपताच खोल नागरणी करावी.

  3.  कापूस संकलन, साठवणूक केंद्रे, जिनींगमध्ये कामगंध सापळे लावावे.

  4.  येणाऱ्या हंगामामध्ये पीक फेरपालट करावे.

  5.  मध्यम व लवकर येणाऱ्या बीटी कपाशईच्या वाणांची वेळेत पेरणी करावी.

  6.  जास्त कालावधीचे वाण टाळावे, तसेच फरदळ घऊ नये.

  7.  रेफुजी कपाशीची लागवड करावी व पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी.

  8.  प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्र, जिनींगमध्ये डिसेंबर ते जूनपर्यंत १५ ते २० सापळे लावावे.

  9.  एकात्मिक कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्क, ट्रायकोकार्डस्, कामगंध सापळे इत्यादीचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com