ई-निविदेत सर्वात कमी, तडजोडीत सर्वाधिक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : ई-निविदेत सर्वात कमी, तडजोडीत सर्वाधिक!

अकोला : ई-निविदेत सर्वात कमी, तडजोडीत सर्वाधिक!

अकोला : महानगरपालिका (Akola Municipal Corporation) क्षेत्रातून दैनंदिन निर्माण होणारा घनकचरा घंटागड्यांद्वारे संकलीत करणे, वाहतूक करणे व नियोजित ठिकाणी पोहोचिण्याच्या कामासाठी ई-निविदा(e-tender) काढण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्यानंतर काम करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे निविदेत सर्वात कमी रकमेची निविदा सादर करणाऱ्या कंपनीसोबत तडजोड करून कंत्राट देण्यास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. प्रशासनाच्या या तडजोडीवर स्थायी समिती सभेतील विरोधी पक्ष सदस्यांनी आक्षेप घेतला तर सत्ताधारी सदस्यांनी समर्थन करीत सूचनांचा पाऊस पाडला.

हेही वाचा: अभिमानास्पद! आता Oxford Business Schoolचे डीन सौमित्र दत्ता

अकोला शहरातून दैनंदिन निघणारा शेकडो टन घनकचरा घरोघरी जाऊन संकलीत करणे, त्याची वाहतूक करणे व नियोजित ठिकाणी पोहोचविण्यासाठी पुढील तीन वर्षांकरिता नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपातर्फे ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील भगत प्लास्टिकने सर्वाधिक रकमेची निविदा भरली होती. त्यापाठोपाठ पुण्याच्या स्वयंभू ट्रान्सपोर्टची तर मुंबईच्या देव बायो फ्युएल, बागोगॅस कंपनीने निविदा सादर केली होती. मात्र, अकोला शहरातील स्थिती व येथील राजकीय व प्रशासकीय स्थिती बघता या कंपन्यांनी सर्वाधिक रक्कमेसह निविदा प्रक्रियेत सहभागी होऊनही कंत्राट स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे मनपा प्रशासनाला नागपूर येथील असेंट बहुउद्देशिय सेवा सहकारी संस्थेसोबत तडजोड करावी लागली.

हेही वाचा: विक्रमगड : आश्रम शाळेतील 13 विद्यार्थ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

निविदा सादर करता या संस्थेने महिनाभरात गोळा होणाऱ्या एकूण रकमेतील केवळ दोन टक्के निधी मनपाला देण्याचे मान्य केले होते. मात्र, तडजोडीनंतर या कंपनीने ता. ३ डिसेंबर २०२१ रोजी अर्ज सादर करून थेट ८.१० टक्के दराने प्रती महा रक्कम देण्याचे मंजूर केले. सोबतच नागपूरच्या कबीर बहुद्देशिय सेवा सहकारी संस्थेनेही आठ टक्के दराने रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र, तडजोडीनंतर नागपूरच्या असेंट बहुउद्देशिय सेवा सहकारी संस्थेला अकोला शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी स्थायी समितीच्या ऑनलाईन आयोजित सभेत मान्यतेकरिता हा विषय ठेवण्यात आला होता. ई-निविदा मागविताना सर्वात कमी रक्कम असतानाही नंतर थेट रक्कम वाढवून देणाऱ्या कंपनीसोबत प्रशासनाने केलेल्या तडजोडीवर शिवसेनेचे राजेश मिश्रा व काँग्रेसच्या सदस्‍यांनी आक्षेप घेतला. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थ करीत कंपनीकडून चांगले काम करून घेण्यासाठी सूचनाची तोंडी यादीच सादर केली. अखेर विरोधी पक्षांचा आक्षेप नोंदवून घेत स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी हा विषय मंजूर केला.

हेही वाचा: शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकऱ्यांचा जीव गेला - सदावर्ते

इतीवृत्तावर दीर्घ चर्चा

मनपाच्या स्थायी समिती सभेत ईतीवृत्त मंजूर करताना दीर्घ चर्चा झाली. त्यात मनपा क्षेत्रातील कुत्र्यांचे निर्बिजिकरण, शिवर येथील जलकुंभ, मनपाच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

ट्रॅक्टरच्या विषयावर तु-तु, मै-मै

मनपातर्फे खरेदी करण्यात आलेल्या २१ टॅक्टरच्या विषयावरून सभेत वादळी चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे राजेश मिश्रा व सत्ताधारी भाजपचे नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती सतिष ढगे यांच्यात ट्रॅक्टरच्या खरेदी खर्चास मंजुरी देण्यावरून तु-तु, मै-मै झाली. ऑनलाईन सभेत दोन्ही सदस्यांमध्ये शाब्दीक वाद झाला. अखेर या विषयात वित्तय खर्चाच्या बाबीस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून मनपा परिसरात पडून असलेल्या ट्रॅक्टरला आता काम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोबतच मनपाचा कंत्राटदाराच्या १७ ट्रॅक्टरवर होणारा खर्चही बंद होणार आहे. मनपाच्या मालकीचे एकूण ३७ ट्रॅक्टर होणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
loading image
go to top