

Welfare Initiatives as Tribute to Balasaheb Thackeray
sakal
अकोला : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष लोकाभिमुख आणि कल्याणकारी उपक्रमांना समर्पित करण्याचा आमचा निर्धार आहे. जनतेच्या विकासातूनच बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे राष्ट्रीय प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यभरात जनसंपर्क आणि प्रचारसभांद्वारे ते नागरिकांशी संवाद साधत असून जनतेच्या आशा-अपेक्षांना न्याय देणारे शासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.