अकोला : सणासुदीच्या काळातही अन्न, औषध तपासणी कागदोपत्रीच!

नागरिकांना सुरक्षित, पोषक व गुणवत्तापूर्ण अन्न मिळण्यासाठी जिल्ह्यात खाद्य पदार्थांच्या विक्रीस्थळाची, पदार्थ तयार करतांना वापरण्यात येणाऱ्या अन्न घटकांची वेळोवेळी पाहणी होणे गरजेचे आहे
enforcement of Food Safety and Standards Drugs and Cosmetics Act on paper only akola
enforcement of Food Safety and Standards Drugs and Cosmetics Act on paper only akolasakal

अकोला : अन्न सुरक्षा व मानदे, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने महागाईच्या काळात भेसळीला प्रोत्साहन मिळत आहे. सनासुदीच्या काळात अन्न, औषध तपासणी कागदोपत्रीच असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना सुरक्षित, पोषक व गुणवत्तापूर्ण अन्न मिळण्यासाठी जिल्ह्यात खाद्य पदार्थांच्या विक्रीस्थळाची, पदार्थ तयार करतांना वापरण्यात येणाऱ्या अन्न घटकांची वेळोवेळी पाहणी होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ व औषधांच्या होणाऱ्या विक्रीबाबत कारवाया थांबलेल्या आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ व औषध विक्रेत्यांच्या आस्थापनांची पूर्ण पाहणी होत नाही. त्यामुळे गुणवत्तेकडून दुर्लक्ष होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असल्यानाही अन्न व औषध विभागाचा सुस्तपणा कमी होताना दिसत नाही.

नियम म्हणतो दहा तपासण्या करा!

औषध विक्री करण्यात येणाऱ्या दुकांनामध्ये महिन्याला किमान दहा तपासण्या करण्याचा नियम आहे. जास्तीत जास्त तपासण्या केल्याने गुणवत्तेबाबत कोणीही निष्काळजीपणा करणार नाही, हा त्यामागील हेतू. मात्र, जिल्ह्यात एकही तपासणी होताना दिसत नाही.

तक्रारींकडेही दुर्लक्ष

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत झालेल्या तक्रारीवर अन्न व औषध विभागाकडून गांभिर्याने कारवाई होत नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com