
Maharashtra Fake Call Scam Former MLA Targeted Using CM Eknath Shinde Name
Esakal
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने कॉल करून शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला-वाशिम रोडवर अपघात झालाय आणि त्यात तिघांचा मृत्यू झालाय. चौघे ऑक्सिजनवर आहेत, ते ठाण्याचे आहेत. त्यांना मदत करा असा फोन शिवसेनेच्या अकोला संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना आला. पण जेव्हा पैशांची मागणी केली गेली तेव्हा यात काही तरी घोटाळा असल्याचा संशय बाजोरिया यांना आला.