निकषांची अडवणूक; विम्यापासून शेतकरी वंचित; आमदारांनी विचारला जाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री पीक विमा योजन

निकषांची अडवणूक; विम्यापासून शेतकरी वंचित; आमदारांनी विचारला जाब

जिल्ह्याची सरासरी पैसेवारीही ५० पैसांच्या आत आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पन्नाचा खर्चही निघाला नाही. असे असतानाही एकाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. इतर ५१ महसूल मंडळात पीक विमा मिळाला नाही.अकोला ः जिल्ह्यातील एकाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक (Soyabeen crop Insurance) विमा मिळाला. इतर ५१ मंडळातील शेतकऱ्यांना निकषांमध्ये अडकवून पीम विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर (Randheer Sawarkar) यांनी गुरुवारी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारला. (Farmers deprived of crop insurance; MLA Randhir Savarkar asked the question)

जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सोयाबीन पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्याची सरासरी पैसेवारीही ५० पैसांच्या आत आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पन्नाचा खर्चही निघाला नाही. असे असतानाही अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील हातरून या एकाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. इतर ५१ महसूल मंडळात पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

हेही वाचा: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांसोबत विमा कंपनीच्या प्रतिनिधीना धारेवर धरून जाब विचारला. कोणते निकष लावून शेतकऱ्यांना विम्यापासून ठेवले वंचित ठेवण्यात आले याबाबत विचारणा करण्यात आली.

हेही वाचा: स्वामित्व योजना काय आहे?, तुमचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढाल, जाणून सोपी प्रक्रीया

यावेळी त्यांच्या सोबत माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, ॲड. अभय थोरात, माधव मानकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, गणेश तायडे, राजेश्वर वैराळे, विनायक वैराळे आदींसह भाजप पदाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अकोला येथे उपस्थित होते.

संपादन - विवेक मेतकर

हेही वाचा: १०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

हेही वाचा: Video: थरारक; आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलिस ठाण्यात घेतले विष

loading image
go to top