esakal | बापाने मुलाला स्वीकारण्यास दिला नकार, आईने टाकले डबक्यात; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बापाने मुलाला स्वीकारण्यास दिला नकार, आईने टाकले डबक्यात; गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि. अकोला) : दोन दिवसाच्या नवजात शिशूला आई, आजी आणि आजोबांनी डबक्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अकोट तालुक्यातील अकोला-गायगाव (akola crime news) मार्गावर घडली. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथील योगेश साहेबराव सोनोने या तरुणाचा विवाह तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील राजेश आनंदा गवारगुरु यांची मुलगी ममतासोबत मे २०२१ मध्ये झाला होता. त्यानंतर ममताला २६ ऑगस्टला बाळ झाले. हे बाळ माझे नाही या कारणावरून पती योगश व ममतामध्ये वाद झाले. ही बाब ममताने आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यांनी आम्ही आता ममताला पंचगव्हाणला घरी घेवून जातो, असे सांगून ते निघून गेले. दोन दिवसानंतर योगेश आपल्या सासुरवाडीत गेला असता बाळ दिसले नाही. त्यामुळे त्याने सर्वांना विचारपूस केली. मात्र, काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने योगेशने थेट तेल्हारा पोलिस ठाणे गाठले. तेल्हारा पोलिसांनी गांभीर्य ओळखून चौकशी केली. चौकशीत नवजात बालकाला अकोला-गायगाव मार्गावरील भौरद नजीकच्या डबक्यात टाकल्याचे समोर आले.

आईसह आजी-आजोबाला अटक -

योगेशने या सर्वांना शेवटी देवरी फाट्याजवळ बघितल्याने तेल्हारा पोलिसांनी चौकशीमधले प्रकरण दहिहांडा पोलिसांकडे वळते केले. दहिहांडा पोलिसांनी २८ ऑगस्टला डबक्यातील बाळ ताब्यात घेवून कायदेशीर प्रक्रियेनंतर शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. १ सप्टेंबरला याप्रकरणी योगेश सोनोने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळाची आई ममता योगेश सोनोने, सासरे राजेश आनंदा गवारगुरु, सासू छाया राजेश गवारगुरु यांच्या विरुध्द ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली. ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी तिघांनाही अकोट न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

loading image
go to top