esakal | आमदार-नगरसेवकांचा राग स्वच्छतेवर काढू नका
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार-नगरसेवकांचा राग स्वच्छतेवर काढू नका

आमदार-नगरसेवकांचा राग स्वच्छतेवर काढू नका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः स्वच्छतेच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखविले जात आहे. आम्ही नियोजन करतो. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी. तुम्ही आमदार-नगरसेवकांचा राग सफाईवर काढू नका, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विजय अग्रवाल यांनी महानगरपालिका सभेत आयुक्तांवर केला. (Former Akola Municipal Corporation Mayor Vijay Agarwal is angry with the commissioner)

हेही वाचा: शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी


१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे कसा पाठवला? यावरून हा वादाला तोंड फुटले. यावरील चर्चेत विजय अग्रवाल यांनी, तुम्ही पडीत वॉर्ड, मजूर, पेट्रोल, ट्रॅक्टर आदीची देयके देत नाहीत. मॅचिंग फंडचा निधीही वळता करीत नाही. यामुळे कामास विलंब होतो. हा विलंब व्हावा, यासाठीच आपण हा प्रस्ताव प्रथम स्थायी समितीकडे पाठवल्याचे सांगितले. हा राग योग्य नाही. आम्ही १५ वया वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन केले, तुम्ही विनाकारण त्रास का देताय? ही बाब स्पष्ट करा, असे अग्रवाल म्हणाले.

हेही वाचा: Akola; नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे स्‍कायलार्क कोविड केअर सेंटर सिल

विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांनी ही देयके देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र ही देयके देता येतात का? ही बाब प्रशासनाने स्पष्ट करावी. पोकलॅन्डची देयके बोगस आहेत. यावर आयुक्त आणि महापौर काहीही बोलत नाही. आम्ही गमती-जमतीसाठी येथे येतो का? महापालिकेत प्रशासन आणि पदाधिकारी मिळून भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही त्यानी केला. शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी पोकलॅन्डच्या देयका बाबत कुठेतरी पाणी मुरतय. या विषयावर पराग कांबळे, रहिम पेंटर, सिद्धार्थ शर्मा, संजय बडोणे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

हेही वाचा: खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, कार - कंटेनर अपघात

विरोध पक्ष नेत्यांकडून महापौरांच्या राजीनाम्याची मागणी
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना कचरा उचलणाऱ्या गाड्यासाठी आंदोलन करावे लागते. महापालिकेत भ्रष्ट्राचार सुरू आहे. स्वच्छतेची समस्या सत्ताधारी सोडवू शकत नसेल तर सत्ताधारी भाजपच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी केली. त्यावरून सभागृहात चांगलीच वादळी चर्चा घडून आली.

संपादन - विवेक मेतकर
Former Akola Municipal Corporation Mayor Vijay Agarwal is angry with the commissioner

loading image