अकोला : अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी!

पालकमंत्र्यांकडून यंत्रणांचा गैरवापर; शासन निधीचा अपहार, वंचित बहुजन आघाडीची पोलिसात तक्रार
अकोला : अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी!
अकोला : अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी! Esakal

अकोला : जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल केले. शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळविला. शासन निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केल्याची पोलिस तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी (ता.३) सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला : अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी!
जळगाव : न्यायालयाचे मनपासह शासन- प्रशासनावर ताशेरे

अकोला जिल्हा नियोजन समितीने वार्षीक आराखडा तयार करताना मागविलेल्या प्रस्तावानुसार ता. १० मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रस्तावामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने काम बदल करताना जिल्हा परिषद यंंत्रणेची मान्यता घेतली नाही. परस्पर स्वतःच्या लेटर हेडवर कामांमध्ये बदल करण्यात आला.

काम बदल करण्याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला नाही. असे असतानाही जिल्ह्यातील तीन रस्ते जे मुळात शासनाच्या लेखी अस्तित्वातच नाही व ज्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाकडून कोणताही क्रमांक दिला नाही, अशा रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियतव्यय मंजूर केला. या कामांचा कार्यारंभ आदेशही काढण्यात आला.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  व इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेत पोलिस तक्रारीबाबत माहिती देताना.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेत पोलिस तक्रारीबाबत माहिती देताना.sakal

जे रस्ते अस्तित्वातच नाही अशा रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्यांच्या कामाचे कार्यरंभ आदेश काढणे, काम जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील असताना ते इतर यंत्रणांकडून करून घेण्यासाठी वळती करणे व शासन निधीची अपघार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सह अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, जि.प. सदस्य पुष्पाताई इंगळे, युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि. प. सदस्य शंकरराव इंगेळ, अरुंधती सिरसाट उपस्थित होते.

अकोला : अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी!
राज्यात सिंचनाचे ३४ प्रकल्प पूर्ण

पत्रकार परिषदेतच खणखणला बाळासाहेबांचा फोन

पालकमंत्र्यांनी रस्त्यावर परस्पर निधी वळता करून शासन निधीचा अपहार केल्याची पोलिस तक्रार दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवास स्थानी पत्रकार परिषद बोलावून माहिती दिली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा फोन खणखणला. तक्रार दाखल केल्यानंतर त्यानुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. यावरून या प्रकरणावर थेट वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकरच लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले.

पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची करणार मागणी

जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी निवडून आणण्यासाठी प्रहारने मदत केली. एक सदस्य असतानाही महिला व बालकल्याण सभापती पद प्रहार जनशक्ती पक्षाला मिळाले. मात्र, या राजकीय घडामोडीचा या तक्रारीशी कोणताही संबंध नसून, पालकमंत्र्यांनी शासन निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने निधी वळता केल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

या रस्त्यांचा आहे समावेश

  • गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोणाऱ्या लहान पुल व पोच मार्गाचे बांधकाम करणे ः किंमत ५० लाख

  • इतर जिल्हा मार्ग ११ ला जोणाऱ्या धामणा (ता. जि. अकोला) मुख्य रस्त्या ते नवीन धामणा जोड रस्त्याची सुधारणा करणे ः किंमत २० लाख रुपये

  • कुटासा ते पिंपळोद रस्त्यावर कुटासा जवळ लहान पुलाचे बांधकाम करणे. हा ग्रामीण मार्ग असून, त्याला इतर जिल्हा मार्गामध्ये दाखवू निधी वळता केला. ः किंमत एक कोटी २५ लाख

एक कोटी ९५ लाखांचा निधी

वंचित बहुजन आघाडीने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार एक कोटी ९५ लाखांचा निधी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी वळती केला. त्यासाठी बोगस दस्तऐवज तयार केल्याचेही तक्रारीत नमुद आहे.

या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी

डीपीसीचे अध्यक्ष पालकमंत्री ओकप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने शासनाने शासनाचे बनावटी दस्तऐवज बनवून फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१ व भादंवी ३४ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी डॉ. पुंडकर यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com