श्रींचा दरबार भाविकांसाठी खुला; सर्वत्र चैतन्‍याचे वातावरण

राज्य शासनाने मंदिरे खुली करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचा दरबार भाविकांना दर्शनासाठी खुला करुन देण्यात आला होता.
Shri Gajanan Maharaj
Shri Gajanan MaharajShri Gajanan Maharaj

शेगाव (जि. बुलडाणा) : राज्य शासनाने मंदिरे खुली करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचा दरबार भाविकांना दर्शनासाठी खुला करुन देण्यात आला होता. त्‍यामुळे आज मंदिरात पहिल्या दिवशी सुमारे ९ हजार भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे मंदिर संस्थानने दर्शनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे भाविक भारावून गेले होते.

Shri Gajanan Maharaj
लखीमपूर घटनेबाबत खंबीर भूमिका घेतल्यानं राज्यात छापासत्र

घटस्थापनेच्‍या मुहूर्तावर (ता.७) राज्यभरातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेऊन भाविकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनाची धावपळ होणार अशी शक्‍यता असताना, नियोजनासाठी प्रसिध्द असलेल्‍या गजानन महाराज मंदिरात मात्र, चोख नियोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे १७ मार्च २०२१ रोजी श्रींचे मंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल ५४२ दिवसांनी नवरात्र उत्सवात विदर्भाचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज मंदीर उघडण्यात आले.

पहाटे ५ वाजता पासून मंदिर दर्शनासाठी खुले केले व रात्री ८ पर्यंत दर्शन सुरू होते. सात महिन्यांच्या कालावधीनंतर येथील श्री गजाननाच्या दर्शनासाठी प्रथमच मंदिर खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून आले. श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत रांगा लागल्या होत्या.

Shri Gajanan Maharaj
'माझी विकेट फक्त..'; सायलीच्या फोटोवरील कमेंटच्या चर्चांवर CSKच्या क्रिकेटरचं उत्तर

भाविकांनी भावपूर्ण वातावरणात श्रींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचपासून दर तासाला ६०० याप्रमाणे रात्री आठ वाजेपर्यंत एकूण नऊहजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मंदिर प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे भाविकांनीही कोरोनाच्‍या सर्व नियमांचे पालन केले.

संस्‍थानच्‍या वतीने चोख व्‍यवस्‍था

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या श्रींचे दर्शन घेता यावे, याकरिता अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था संस्थानने केली होती. प्रत्येक भाविकामध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते. एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता बाळगण्यात आली. निर्जंतुकीकरण, स्वच्छता, दोन भक्तांमध्ये सुरक्षित अंतर यासह शांतता, भक्तिभाव, आदरातिथ्य करून भक्तांची श्रींच्या दर्शनाची कित्येक महिन्यांची मनोकामना पूर्ण झाली.

ई-पास घेऊनच भक्तांनी घेतले दर्शन

आज पुणे, मुंबईतील भक्त पहिल्याच दिवशी ई-पास घेऊन दर्शनासाठी आले होते. सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होते. जुन्या दत्त मंदिरासमोरून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत आहे. आजपासून तीन दिवसांच्या ई-पास वितरित झाल्या असून, भाविकांनी गर्दी न करता ई-पास घेऊन दर्शनाला यावे. सोबत आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे संस्थानतर्फे कळविण्यात आले आहे. कोरोनामुळे श्रींच्या दर्शनासाठी यावेळी प्रथमच हार, फुले, प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. बाहेर गावावरून आलेल्या व ज्या भाविकांनी ई-दर्शन पास काढलेली आहे, अशांना श्री गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित बाळापूर मार्गावरील विसावा, विहार व भक्तनिवास संकुल आदी ठिकाणी थांबण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com