Ganesh Chaturthi 2023 : मुंबईचे बाप्पा पोहोचले अकोटात, प्रथमच आणली मूर्ती; थाटात आगमण

लाडक्या बाप्पाचे सर्वत्र उत्साहात स्‍वागत होत आहे. या उत्सवासाठी अकोट येथे खास मुंबईच्या बाप्पाचे आगमण झाल्याने हा उत्साह द्विगुणत
Ganesh Chaturthi 2023 brings ganesha idol for first time from mumbai Bappa reaches Akot
Ganesh Chaturthi 2023 brings ganesha idol for first time from mumbai Bappa reaches AkotSakal

अकोट (जि.अकोला) : लाडक्या बाप्पाचे सर्वत्र उत्साहात स्‍वागत होत आहे. या उत्सवासाठी अकोट येथे खास मुंबईच्या बाप्पाचे आगमण झाल्याने हा उत्साह द्विगुणत झाला आहे. प्रथम अकोला जिल्ह्यात मुंबई येथून लालबागच्या राज्याची प्रतिकृती असलेली मूर्ती आणण्यात आली आहे.

मोठ-मोठ्या आकर्षक देखण्या बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ता. १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र होत आहे. या उत्सवासाठी अकोट येथील गजानन नगरच्या राजाची मूर्ती थेट मुंबईहून आणण्यात आली. ३६ तासाचा प्रवास करीत मूर्ती रविवारी अकोट येथे पोहोचली. यावेळी लाडक्या बाप्पाचे अकोट येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Ganesh Chaturthi 2023 brings ganesha idol for first time from mumbai Bappa reaches Akot
Ganesh Chaturthi 2023 : 'अल्लु तुझी लेक तुझ्यासारखीच कलाकार'! आरहानं तयार केलेला बाप्पा नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय

गजानन नगर वासीयांनी वाजत गाजत बाप्पाचे स्वागत केले. बाप्पाचा आगमन सोहळा दुपारी ३ वाजल्यापासून ढोल ताशांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. मंगळवारी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गजानन नगरच्या राजाचे यंदाचे २१ वे वर्ष असून, दहा दिवसांच्या आगमन काळात मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विशाल भगत यांनी सांगितले.

Ganesh Chaturthi 2023 brings ganesha idol for first time from mumbai Bappa reaches Akot
Akola News : शेतकऱ्यांना दिलासा! आवक कमी झाल्याने तुरी १२ हजारांवर

मुंबईहून मूर्ती आणण्याची प्रथम वेळ

विदर्भात पहिल्यांदाच गणरायाची मूर्ती थेट मुंबईहून बोलाविण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विशाल भगत यांनी सांगितले. गजानन नगरच्या राजाचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून दर्शन घेत होते. काहींना मुंबई हुन आणलेली गणरायाचा आकर्षक आणि दिव्य मूर्तीची छबी आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेण्याचा मोह आवरता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com