दुर्दैवी; शॉक लागलेल्या मुलीला उपचारासाठी नेत असताना अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी; शॉक लागलेल्या मुलीला उपचारासाठी नेत असताना अपघातात मृत्यू

दुर्दैवी; शॉक लागलेल्या मुलीला उपचारासाठी नेत असताना अपघातात मृत्यू

अकोला : एका 21 वर्षीय मुलीला शॉक लागल्याने तिला हिवरखेड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी तेथे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होऊ शकली नाही. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी बोलेरो गाडीतून उपचारासाठी नेत असताना बोलेरो पलटी होऊन तिचा करुण अंत झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.

हेही वाचा: ड्रग्ज सापडण्याआधी गुजरातच्या 'त्या' बंदराचं नाव वेगळं - कोल्हे

अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील इंदिरा नगर परिसरात राहणारी आश्विनी गजानन सोनोने हिला विजेचा शॉक लागल्याने तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यासाठी अँबुलन्स मिळाली नाही. त्यामुळे तिच्या भावांनी तिला खाजगी बोलेरो गाडीतून नेत असताना बोलेरो गाडीचा अपघात झाला बोलेरो गाडीतून अकोला येथे जाण्यासाठी निघाले असता हा अपघात झाला.

हेही वाचा: Video : विल्यमसनचा एक कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला पडलं भारी

हिवरखेड गावाच्या बाहेरच पहिल्या नाल्यानजीक बोलेरो गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात हेमंत गजानन सोनोने, सागर गजानन सोनोने मंगेश दुतोंडे आणि प्रफुल्ल वानखडे (चालक) हे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

loading image
go to top