कृषिपंपाला वीज रात्री ऐवजी दिवसा द्या! | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : कृषिपंपाला वीज रात्री ऐवजी दिवसा द्या!

अकोला : कृषिपंपाला वीज रात्री ऐवजी दिवसा द्या!

तेल्हारा : तालुक्यात वाघाची दहशत असल्यामुळे कृषिपंपाला वीज पुरवठा दिवसा करण्याची मागणी तालुक्यातील कोठा, रायखेड, बेलखेड शिवारामधिल शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे.

परिसरात वाघाने काही पाळीव जनावरांची शिकार केली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून या शिवारात वाघ असल्याचे सांगितले. अद्याप वाघाला पकडण्यात आले नाही. वाघाचे शेतकरी व शेतमजुरांना दररोज दर्शन होत आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. रब्बी हंगाम सुरू झाला असून, पेरणी आटोपली आहे. कृषिपंपाला रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देण्याकरिता मध्य रात्री शेतात जावे लागते.

हेही वाचा: अहमदनगर : सहायक पुरवठा अधिकारी पारनेरचे प्रभारी तहसीलदार

या दरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी माळेगाव व बेलखेड फिडरवरील शेतकऱ्यांनी मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर मंगेश ठाकरे, बबलू ठाकूर, दयालसिंह बलोदे, श्रीराम ठाकरे, श्रीकृष्ण ठाकरे, श्याम घोंगे, प्रशांत ठाकरे, वसंता घंगाळ, अनील पांडे, कार्तिक पोहरकार, किशोर कापसे, विजय ठाकरे, अमित ठाकरे, अश्वीन ठाकूर, गणेश थारकर, राहुल झापर्डे, मंगेश मामनकार, मधुकर गाडगे, अनील ठाकरे यांच्या सह्या आहेत.

loading image
go to top