नागपंचमीच्या दिवशी २५ सापांना जीवदान

पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार
Snake
Snakesakal

अकोला - नागपंचमीच्या दिवशी पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मंगळवारी (ता. २) तब्बल २५ सापांना जीवदान देण्यात आले. यामध्ये सहा कोब्रा, चार रसाल वायपर, एक मण्यार, पाच धामण, दोन तस्कर, चार कवड्या, एक कुकरी, एक साप नानेटी तर एक साप हा दिवड हे या जातीचा होता. सदर सर्व सापांना सर्पमित्रांनी गत दहा तासापूर्वीच पकडले  होते.

एरवी बहुतेकांना भीतीदायक वाटणाऱ्या सापाला नागपंचमीच्या दिवशी विशेष महत्व असतं. नागपंचमीच्या या दिवशी सापाला देवाचं रुप मानून त्यांची पूजा केली जातो. त्यांना नैवेद्यही दिला जातो. तरीही अद्याप सापांच्या बाबत लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आणि माहितीचा अभाव आहे. त्यामुळे नागरिक रहिवाशी क्षेत्रात साप निघाल्यास त्यांच्यावर हल्ला करतात. परंतु काही सर्पमित्र मात्र सापांचा जीव वाचवण्यासाठी तत्पर असतात. त्यानुसार पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता. २) नागपंचमीच्या दिवशी तब्बल २५ सापांना जीवदान देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com