esakal | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ठरतेय मृगजळ; निकष ठरत आहेत अडसर
sakal

बोलून बातमी शोधा

Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme does not benefit farmers

ही योजना विमा कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ठरतेय मृगजळ; निकष ठरत आहेत अडसर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टूनकी (बुलडाणा) : शेती व्यवसाय करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत तालुक्‍यातील १२ प्रकरणे दाखल असून यामधील ९ पात्र, १ अपात्र आणि २ त्रुटी आहेत. त्‍यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत असल्‍याचे चित्र आहे.

गारपिटीने कांदा पिकाचे मोठे नुकसान; कृषी सेवकांसह पदाधिकार्‍यांनी घेतली नुकसानग्रस्त भागात धाव
 
दुर्दैवाने अपघात झाल्यास, योजनेच्या निकषानुसार सरकारने नियुक्त केलेली विमा कंपनी दोन लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते. प्रचलित योजनेत शेतकऱ्याचे कुटुंब विमा छत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यासाठी देखील लाभ देण्यात येणार आहे. ही योजना विमा कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू आहे. या कालावधीत खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरतात. 

वादळी वार्‍यात पपई फळाचा मळा उद्ध्वस्त

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येते. योजनेंर्तगत अपघाती मृत्यू झाल्यास, अपघाताने दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात पडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरुन पडणे, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्ल्‍यामुळे किंवा चावण्याने होणारे अपघाती मृत्यू या कारणांनी मृत्यू झाल्यास या विमा योजनेद्वारे विमा योजनेत सहभागी असणाऱ्यांना लाभ दिला जातो. त्यासाठी अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, निर्धारित केलेल्या संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव द्यावा लागतो. 

कंपनीद्वारे शहानिशा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्‍ध्वस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योजनेचा संग्रामपूर तालुक्यात सन २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षभरात प्राप्त १२ अर्जापैकी ९ अर्ज मंजूर झालेले आहेत. तर २ अर्ज प्रलंबित व एक अर्ज त्रुटीत काढत, विमा कंपनीकडूनच या योजनेला ‘खो’ दिला जात आहे. निकषाअभावी तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकरी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मिळण्यापासून वंचित राहताना दिसत आहेत. 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अपघातग्रस्त शेतकरी कुंटूबाकरीता जरी लाभदायी असली तरी निकषाअभावी तालुक्यातील बरेच अपघातग्रस्त शेतकरी कुंटूब या योजनेपासून कागद पत्रातील त्रुट्या भरुन निघत नसल्याने लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे निकषात बदल करणे महत्वाचे आहे. 
- विजय हागे, जिल्हा उपाध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी

loading image