Akola News : मदत मिळाली पण शेतकऱ्यांच्या पदरी प्रतीक्षा!

दिवाळी संपल्यानंतरही ३३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित
heavy rain crop damage 33 thousand Farmers deprived of help state govt akola
heavy rain crop damage 33 thousand Farmers deprived of help state govt akolasakal

अकोला : जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून १३४ कोटी २९ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला.

दिवाळीपूर्वी मिळालेल्या या निधीचे वितरण अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण झाले नसून २३ हजार ३६७ शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी निधी मिळूनही त्याचे वाटप होत नसल्याने शासकीय यंत्रणेची काम करण्याची कासवगती दिसून येत आहे.

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूंग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला.

परिणामी शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक त्यानंतर अंतिम अहवाल तयार करून शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने शेती नुकसानीसाठी निधी मंजूर केला आहे. सदर निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.

परंतु त्यानंतर जवळपास एक आठवडा सदर निधीचे वितरण रखडले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा करण्यास सुरुवात झाली असून अद्यापही २३ हजार ३६७ शेतकरी मदतीपासून वंचितच असल्याचे दिसून येते. दिवाळीपूर्वी मिळालेल्या निधीचे वाटप अद्यापही पूर्ण न झाल्याने प्रशासन किती गंभीर आहे, हे दिसून येते.

असे झाले होते नुकसान

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १ लाख २० हजार १८८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १३४ कोटी २९ लाख ८ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत. अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ६११ गावांना बसला होता. त्यामध्ये जिरायती क्षेत्र, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्राचा समावेश आहे.

मदत निधीचे ७५ टक्के वाटप

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत अकोला तालुक्यातील ६६.२७, बार्शीटाकळी तालुक्यातील ४६.५९, अकोट ७५.९१, तेल्हारा ८२.६१, बाळापूर ८७.४२, मूर्तिजापूर ७७.८३ तर पातूर तालुक्यात ९२.२७ टक्के असे एकूण जिल्ह्यात सरासरी ७४.६६ टक्के शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com