esakal | Success Story: मागणी ओळखून थाटला व्यवसाय, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या उत्पादनाला बाजाराची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Hivara Ashram Buldana Marathi News Success Story: Recognizing Demand,Start Business, Market Demand for Smallholder Farmers Products

शेती हा भारतीय अर्थव्यस्थेचा कणा आहे. शेतकरी जगाचे पालन व पोषण करण्यात महत्वाची भूमीका बजावितो. मात्र अजून सुध्दा ग्रामीण भागातील शेतकऱ्याला बाजारपेठेचे योग्य ज्ञान नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते.

Success Story: मागणी ओळखून थाटला व्यवसाय, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या उत्पादनाला बाजाराची मागणी

sakal_logo
By
संतोष थोरहाते

विकेल ते पिकेल अभियानातून कष्टाचे झाले सोने!

बाजारपेठेचा कल ओळखून उत्पादन, ताजा व दर्जेदार भाजीपाल्या मागणी

Success Story: मागणी ओळखून थाटला व्यवसाय, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या उत्पादनाला बाजाराची मागणी

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) : शेती हा भारतीय अर्थव्यस्थेचा कणा आहे. शेतकरी जगाचे पालन व पोषण करण्यात महत्वाची भूमीका बजावितो. मात्र अजून सुध्दा ग्रामीण भागातील शेतकऱ्याला बाजारपेठेचे योग्य ज्ञान नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते.

रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याची व मालाची मातीमोल भावात विक्री करावी लागते.  शेतात पिकविलेल्या भाजीपाला व मालाला बाजारपेठेत योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान होते.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल संकल्पना अंतर्गत शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये थेट विक्री होते. यामुळे शेतकरी व ग्राहकांचा फायदा होतो.

हिवरा आश्रम येथील शेतकरी ज्ञानेश्वर गणेशराव दळवी हे अल्पभूमीधारक असून शेतीसोबत भाजीपाला विक्री सुध्दा करतात. ज्ञानेश्वर दळवी हे ग्राहकांच्या मागणीचा  विचार करून आपल्या शेतात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त,दर्जेदार व ताजा भाजीपाला कमी दरात मिळतो. त्‍यामुळे ग्राहकांचा आर्थिक फायदा होतो. विकेल ते पिकेल यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतात.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पिकेल ते विकेल या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती साध्य करता येते.  विकेल ते पिकेलमुळे ग्राहकांना ताजा व दर्जेदार भाजीपाला अत्यंत कमी दरात उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांच्या पैशाची सुध्दा बचत होते. विकेल ते पिकेल या संकल्पनेमुळे शेतकरी ते ग्राहक साखळी निर्माण होते होऊन ग्राहकांचा फायदा होतो.

यामुळे ग्राहकांना ताजा व दर्जेदार भाजीपाला अत्यंत माफक दरात उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांच्या दोन पैशात बचत सुध्दा होते. विकेल ते पिकेल संकल्पनेची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे. त्‍यामुळे शेतकऱ्याला शाश्वत अर्थाजनाचे साधन उपलब्ध होईल.अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री  करतांना शेतकरी श्री ज्ञानेश्वर दळवी,हिवरा बु उपस्थित मंडळ कृषी अधिकारी मेहकर, विनोद मोरे कृषी पर्यवेक्षक सुधाकर कंकाळ कृषी सहायक राहुल घुबे कृषी मित्र प्रदीप बोरे सागर म्हस्के

हेही वाचा - अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे

 ताजा भाजीपाला ग्राहकांच्या हातात
विकेल ते पिकेल या संकल्पनेतून हिवरा आश्रम येथील शेतकरी ज्ञानेश्वर दळवी  यांनी आपल्या शेतात मेथी,कांदा,मुळा,वांगे,आंबड चुका,पालक,मिरची,कोथिंबीर,टमाटे यांचे उत्पादन घेतले. त्यामुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळतो.

मी माझ्या शेतातमध्ये ग्राहकांच्या मागणीचा कल विचारात घेवून भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. पिकेल ते विकेल या संकल्पनेतून आर्थिक हातभार मिळाला आहे.
ज्ञानेश्वर गणेशराव  दळवी , शेतकरी हिवरा आश्रम

(संपादन - विवेक मेतकर)

loading image