
हिवरखेड: प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी ‘फ्रिस्टाईल’
तेल्हारा (जि.अकोला) ः लसीसाठी (vaccination) हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘फ्रिस्टाईल’ हाणामारीचा प्रसंग घडला. यात एका नामवंत राजकीय पक्षाचा ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती आहे. Hivarkhed: 'Freestyle' for vaccination at primary health center
हिवरखेड पोलिस सूत्रांच्या माहितीवरून फिर्यादी सुशील त्र्यंबकराव खिरोडकार याच्या जबानी तक्रारीनुसार ते त्यांच्या आईला लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रार गेले होते. त्यांनी लस बाबत विचार पूस केली व त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य रवी मधुकर घुंगड हे आशा सेविका यांना रजिस्टर बाबत मागणी करत होते.
हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!
त्यांना खिरोडकार यांनी तू कोण रजिस्टर पाहणारा एवढे बोलताच खिरोडकार यांच्या माहितीवरून सदस्य रवी उर्फ राणा हे चिडले व मी कोणाला लस देणार हा माझा अधिकार आहे, असे सांगून त्यांनी माजी सरपंच स्व. त्र्यंबकराव यांच्या मुलाला मारहाण केली. सुशील खिरोडकार यांनी तत्काळ हिवरखेड पोलिस स्टेशन गाठले व सदर घटनेची तक्रार दिली. दुसरीकडे याच घटनेची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रवी मधुकर घुंगड यांनी सुद्धा हिवरखेड पोलिस स्टेशनला दिली.
हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो
रवी घुंगड यांच्या तक्रारीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात ते एका सामान्य नागरिकांना लस का दिली नाही, त्या व्यक्तीला तुम्ही का परत केले, मला रजिस्टर बघू द्या, अशी विचारणा करण्यासाठी आशा वर्कर सीमा विनोद भोपळे यांच्याकडे रजिस्टर देण्याची विनंती केली. तेथील उपस्थित नागरिक सुशील खिरोडकार यांनी तू कोण रजिस्टर पाहणारा कोण, असा प्रश्न करून रवी घुंगड यांना मारहाण केली. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल करून घेतल्या आहेत.
संपादन - विवेक मेतकर
Web Title: Hivarkhed Freestyle For Vaccination At Primary Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..