esakal | आयएएस अधिकारी पुणे सोडून अकोल्याला पसंती देतील का?
sakal

बोलून बातमी शोधा

akola news

आयएएस अधिकारी पुणे सोडून अकोल्याला पसंती देतील का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : गेले तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अकोला महानगरपालिका आयुक्तपदासाठी आणखी एका नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश बुधवारी सायंकाळी निघालेत. सन २०११ च्या बॅचच्या आयएएस असलेल्या व सध्या पुणे येथे नियुक्त असलेल्या कविता द्विवेदी पुणे शहर सोडून अकोल्यासारख्या ‘ड’ वर्ग महानगरपालिकेला पसंती देतील का, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत प्रतीक्षातच आहे.

अकोला जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त नीमा अरोरा यांची आठ महिन्यांपूर्वी अकोला मनपात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अल्पावधितच त्यांना अकोला जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले. त्या सन २०१४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या जागेवर अकोला जिल्हाधिकारी पदावरून जितेंद्र पापळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पापळकर रुजू झाले नाहीत. नंतर त्यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून नीमा अरोरा यांच्याकडेच प्रभार आहे. त्या जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त अशा दोन्ही पदावर सध्या कार्यरत आहेत.

हेही वाचा: अकोल्यात वाढली देशी कट्टा बाळगण्याची ‘क्रेझ’!

दरम्यान, गोविंद बोडके या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची अकोला मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही अकोल्यात रूजू होणे पसंत केले नाही. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांबाबत उत्सुकता होती. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघालेत. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे नियुक्त कविता द्विवेदी यांची अकोला मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्याही अकोल्यात रूज होतील की नाहीयाबाबत अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. पुण्यासारख्या मोठ्या शहरात काम केल्यानंतर त्या अकोल्याला पसंती देणार नाहीत, अशीच चर्चा सध्या मनपा वर्तुळात रंगली आहे.

अफवांचा बाजार

आयुक्त म्हणून कविता द्विवेदी यांची बदली झाल्याची यादी समाजमाध्यमांवरून व्हायलर होताच शहरात अफवांचा बाजार गरम झाला. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनीच कवित द्विवेदी यांची नियुक्ती करून घेतली, दोन्ही अधिकारी एकाच बॅचच्या अधिकारी आहेत, अशा अफवांची चर्चा जोमाने सुरू झाली. मात्र, जिल्हाधिकारी अरोरा यांनाच रात्री उशिरापर्यंत द्विवेदी यांच्या नियुक्तीबाबतची माहिती नव्हती.

हेही वाचा: भाजपचं मिशन लोकसभा? सेनेला शह देण्यासाठी रणनिती आखल्याची चर्चा

जिल्हातील प्रशासन महिलांच्या हाती?

अकोला महानगरपालिका आयुक्त म्हणून कविता द्विवेदी रूजू झाल्यास अकोला जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय पदे महिलांच्या हातात येणार आहे. एकप्रकारे महिलांच्या हाती प्रशासनाची दोरी येणार आहे. जिल्हाधिकारी नीमा अरोरा या अकोल्यातील पहिल्या महिला जिल्हाधिकारी व पहिल्याच महिला मनपा आयुक्त ठरल्या होत्या. त्या सध्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्यापाठोपाठ अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्याकडे पोलिस दलाची कमान आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बुधवारीच बुलडाणा येथून जयश्री वसे रूजू झाल्या आहेत. यापूर्वी शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा शल्यचिकत्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, एसटी महामंडळाच्या अकोला विभागीय नियंत्रक आदी पदांवरही महिला अधिकारीच कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्‍यातील प्रशासन, शिक्षण, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्था या महिला अधिकाऱ्यांच्या हातात आल्या आहेत.

loading image
go to top