esakal | दोन दिवसांत २४ जणांचा मृत्यू, एक हजार १६२ नवे रुग्ण आढळले
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसांत २४ जणांचा मृत्यू, एक हजार १६२ नवे रुग्ण आढळले

दोन दिवसांत २४ जणांचा मृत्यू, एक हजार १६२ नवे रुग्ण आढळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू ससंर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त २४ जणांना दोन दिवसांत मृत्यू झाला. त्यात शनिवारी (ता. १) १३ तर रविवारी (ता. २) ११ रुग्णांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सदर दोन दिवसांत १ हजार १६२ नवे रुग्णही आढळले. असे असले तरी दोन दिवसांमध्ये ९१६ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोनाचे रविवारी (ता. २) आरटीपीसीआरच्या चाचणीत ३७६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच रॅपिडच्या चाचणीत २२३ जण पॉझिटिव्ह आल्याने रविवारी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत ५९९ नव्या रुग्णांची भर पडली. त्यात त्यात १५३ महिला व २२३ पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूरमध्ये ३९, अकोट-३३, बाळापूर-३७, तेल्हारा-चार, बार्शीटाकळी-१६, पातूर-२५, अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्रात १८६ नवे रूग्ण आढळले. शनिवारी (ता. १) कोरोनाचे आरटीपीसीआरच्या चाचणीत ३६८ व रॅपिड चाचणी १९५ असे एकूण पॉझिटीव्ह ५६३ जण पॉझिटिव्ह आले. त्यात १५८ महिला व २१० पुरुषांचा समावेश आहे. मुर्तिजापूरमध्ये १९, अकोट-५१, बाळापूर-३४, तेल्हारा-सात, बार्शीटाकळी-१५, पातूर-दोन, अकोला ग्रामीण-३३, अकोला मनपा क्षेत्रात २०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ४१३२२

- मृत - ७१३

- डिस्चार्ज - ३५०८५

- ॲक्टिव्ह रुग्ण- ५५२४

संपादन - विवेक मेतकर

loading image