खामगाव : चार दिवसांत ४८ लाखांचे उत्‍पन्न बुडाले; एसटी कर्मचारी संपावर ठाम

खामगाव आगारातील चालक, वाहक व मेकॅनिक यांनी गत चार दिवसांपासून संपात सहभागी झाले असल्याने खामगाव आगारातून एकही बस सुटली नाही.
ST strike
ST strikesakal

खामगाव (जि. बुलडाणा) - आगारातील चालक, वाहक व मेकॅनिक यांनी गत चार दिवसांपासून संपात सहभागी झाले असल्याने खामगाव आगारातून एकही बस सुटली नाही. तर मागण्या मान्‍य होईपर्यंत एसटी कर्मचारी संपावर ठाम असून, त्‍यामुळे चार दिवसात आगाराचे सुमारे ४८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. बस बंद असल्याने येथील बसस्थानक परिसरात प्रवासी फिरकत नसल्याने बसस्थानकामध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे. आज संपाचा चौथा दिवस असून, अद्यापपर्यंत आंदोलनावर कोणताच तोडगा निघाला नाही.

खामगाव आगारात ५६ बसेस आहे. या बसेस गत चार दिवसापासून आगारात उभ्या असून, त्यामुळे आगाराच्या आवारात बसेसच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. खामगाव आगारातून १०९ चालक, ९० वाहक व ३० च्या जवळपास मॅकेनिकल आहे. हे सर्व जण संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे आगाराचेे दररोज १२ लाखाचे नुकसान होत आहे. प्रवासी वाहतूक बरोबरच माल वाहतूक बंद असल्याची माहिती बसस्थानक प्रमुख आर.यु.पवार यांनी दिली.

काही नोकरदार वर्ग व ज्यांना बाहेरगावी जाणे गरजेचे आहे ते लोक काळी पिवळी टॅक्सी व खासगी वाहनातून प्रवास करीत आहेत. बसेस बंद असल्याने काळी पिवळी टॅक्सी चालक व अन्य प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक प्रवाशांकडून दीडपट तर कुठे दुप्पट भाडे घेत आहे. पर्याय नसल्याने ते प्रवासी पैसे देऊन आर्थिक भूर्दंड सहन करीत आहेत.

ST strike
बुलडाणा : नगराध्यक्षांनी जमविली बेहिशोबी मालमत्ता; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एसटीचा प्रवास सुखकर असल्याचे मानले जाते. त्यामुळे बहुतांश लोकांचा कल हा एसटीने प्रवास करण्यावर दिसून येतो. पण एसटी बंद असल्याने तो प्रवास आता अनेकांच्या दृष्टीने धोकादायक व डोकेदुखीचा विषय बनला आहे. काळी पिवळी व खाजगी वाहनातून क्षमतेच्या दुप्पट प्रवासी घेऊन आपापल्या मार्गावर वाहन चालवित आहे. वयोवृद्ध हे गर्दीत प्रवास करण्याचे टाळत आहे.

दरम्‍यान, खासदार, आमदार, माजी आमदार यांच्‍यासह विविध पक्ष संघटना या आंदोलनास आपला पाठिंबा देत असल्‍याने कर्मचाऱ्यांना एकप्रकारे पाठबळ मिळत असून, यावेळी मागण्या मान्‍य झाल्‍याशिवाव मागे हटायचे नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला असून, दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा संप केव्हा मिटतो याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

आगारातील सर्व प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या बसेस तीन दिवसांपासून संपामुळे बंद आहे. त्यामुळे आगाराला दररोज मिळणाऱ्या १२ लाख रुपयांच्या उत्पन्नास मुकावे लागत आहे. आगारातील चालक, वाहक, मॅकेनिक व अन्य कर्मचारी संपावर गेले आहेत.

- आर. यु. पवार, बसस्थानक प्रमुख खामगाव आगार

स्‍कूल बसेस रांगेत

एसटी बंद असल्‍याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्‍यान, सरकारने खासगी बसेस, स्‍कूल बसेस, कंपनीच्‍या मालकीच्‍या बसेस आणि मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी, काळीपिवळी सोबत आता स्‍कुल बसेसही सुरु झाल्‍या आहेत. गत दीड वर्षाच्‍या काळात कोरोनामुळे स्‍कूल बसेसची चाके थांबली आहेत. एसटी बसेस बंद असल्‍याने संधीचे सोने करण्याचे काम स्‍कुल बसेस मालकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com