esakal | वीज देयक माफ करण्यासाठी अधिकाऱ्यांना कंदील भेट
sakal

बोलून बातमी शोधा

वीज देयक माफ करण्यासाठी अधिकाऱ्यांना कंदील भेट

वीज देयक माफ करण्यासाठी अधिकाऱ्यांना कंदील भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः सतत होत असलेल्या वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी व विद्युत देयक माफ करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना कंदील सुद्धा भेट देण्यात आला. (Lantern gift to officials to waive electricity bill)

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव हाेण्यापूर्वी महाविकास आघाडीतील ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करायची सरकारमध्ये धमक नसल्यास निदान सक्तीने वीजबिल वसुली तरी करु नये. विद्युत निर्मितीसाठी प्रतीयुनीट ६३ पैसे खर्च येताे.

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

नफा, अन्य खर्चासह ग्राहकाला १.९३ पैसे प्रतीयुनीट दर ग्राहकाला आकारणे अपेक्षित आहे. यात मिटर भाडे जाेडल्यास २.९३ रुपये दर हाेताे. मात्र ग्राहकाला १०० युनीटपर्यंतचा दर ५.३४ पैसे प्रती युनीट, आकारण्यात येत असल्याचा उल्लेख बहुजन मुक्ती पार्टीच्यी वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे.

हेही वाचा: पहिलीच्या प्रवेशासाठी साडेपाच वर्षाची अट

थकीत देयक माफ करा, नवीन आकारणी याेग्य पद्धतीने करा, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल इंगळे, ॲड. सारंग निखाडे, नेहा शेगाेकार, प्रज्ञा निखाडे, रेणुकाच चापके, आकाश चापके, प्रविणा भटकर, नागेश राऊत, वंदना अवचार, तेजस बाभुळकर, प्रशिक मेश्राम, अजय जंजाळ, विकास माेरे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी


या मागण्यांकडे वेधले लक्ष

- २००० युनीटपर्यंतचे देयक माफ करण्यात यावे.
- मीटर भाड्यात कपात करण्यात यावी.
- विद्युत स्थिर आकार व प्राथमिक भाव याप्रमाणे देयक दर आकारण्यात यावे.
- सक्तीची वसुली थांबविण्यात यावी.
- मार्च २०२०पासून विद्युत देयक थकित असलेल्या ग्राहकांसाठी अभय याेजना तयार करण्यात यावी आणि वर्षभर त्यांना देयक आकारण्यात येऊ नये.

Lantern gift to officials to waive electricity bill

loading image