Akola News : चार औषध एजन्सीचा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित

दवा बाजार अकोला येथील चार औषध पेढ्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आली
License of four medical drug agencies suspended for 30 days akola marathi news
License of four medical drug agencies suspended for 30 days akola marathi newsSakal

अकोला : दवा बाजार अकोला येथील चार औषध पेढ्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आली. त्यात अनियमितता आढळून आल्याने दंड आकारून कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली. त्या अनुषंगाने ३० दिवसांकरित चारही पेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

अकोला शहरातील मुख्य होलसेल औषध विक्रीची दुकाने दवा बाजारात आहे. येथे विविध एजन्सीतर्फे ठोक औषध विक्री होते. काही पेढ्यांतर्फे औषध विक्रीत अनियमतता होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती.

त्या तक्रारीनुसार औषध निरीक्षक स.मो. राठोड यांनी केलेल्या पाहणीत मे व्होरा एजन्सी, मे द अशोक फार्मा, मे भरतीय एजन्सी आणि श्री डिस्ट्रीव्युर्टस या पेढ्यांमधून प्रतिबंधित औषध साठा विक्रीसाठी मुक्त केल्याचे आढळून आले. त्यामुळे या चारही पेढ्यांवर कारवाई करण्यात आली.

दंड आकारणी अन् कारणेदाखवा नोटीस

औषध निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळून आलेल्या अनियमितेनंतर मे व्होरा एजन्सीला ५१ हजार ६४९, मे द अशोक फार्माला ५० हजार १५७, मे भरतीया एजन्सीला ३२ हजार ७९५, श्री डिस्ट्रीब्युर्टसला एक लाख एक हजार ४७६ रुपये दंड आकारण्यात आला. याशिवाय कारणे दाखवा नोटीस बजावून चारही पेढ्यांचा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या पेढ्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दवा बाजार बंद ठेवून निषेध

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात रविवारी औषध विक्रेत्यांनी दवा बाजार बंद ठेवून कारवाईचा निषेध नोंदविला. करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असून, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी औषध विक्रेत्यांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com