आले हो आले ‘किडींचे’ दिवस आले! शेतकऱ्यांनो सावधान....

अनुप ताले
Monday, 7 September 2020

शेती उत्पन्न घटण्यासाठी किडी, रोग मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. शेती व शेतकरी विकासाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी समस्या असून, ती सोडविण्यासाठी शासनाने कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व इतर यंत्रणांमध्ये कीड व रोग निंयत्रण विभाग तयार केले आहेत. या सर्व माध्यमांद्वारे कीड नियंत्रणासाठी, निर्मूलनासाठी प्रयत्न केले जातात, तरीसुद्धा दरवर्षी किडींचा प्रादुर्भाव वाढतच असून, आता कीड ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी, समस्या बनली आहे. 

अकोला : दरवर्षीच शेतकऱ्यांचे जवळपास ३० टक्के उत्पन्न कीडच फस्त करते. त्यामुळे पिकावर कीड येणार म्हटले की, शेतकऱ्यांने डोक्यावर हात मारलाच समजा...आताही शेतकऱ्यांची चिंता वाढणार असून, वातावरणातील बदल आणि पीक अवस्था यानुसार या पंधरवाड्यात किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

 

शेती उत्पन्न घटण्यासाठी किडी, रोग मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. शेती व शेतकरी विकासाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी समस्या असून, ती सोडविण्यासाठी शासनाने कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व इतर यंत्रणांमध्ये कीड व रोग निंयत्रण विभाग तयार केले आहेत. या सर्व माध्यमांद्वारे कीड नियंत्रणासाठी, निर्मूलनासाठी प्रयत्न केले जातात, तरीसुद्धा दरवर्षी किडींचा प्रादुर्भाव वाढतच असून, आता कीड ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी, समस्या बनली आहे. सध्याही वातावरणात वेळोवेळी बदल होत असून, आठवडाभर पाऊस अन् आता आर्द्रता, उष्णता वाढल्याने किडींसाठी पोषक वातावरण बणले आहे. त्यामुळे या पंधरवाड्यात सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके व फळ पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी सतर्क राहात आवश्‍यक त्या उपाययोजना, व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

 

हे ही वाचा : अरे देवा....कापूस, सोयाबीन यंदाही ‘दारिद्र्य रेषेखाली’च!

 

निंबोळी अर्काची फवारणी करा 
सध्या वातावरणात आमुलाग्र बदल होत असून, पिकाच्या अवस्थेनुसार या दिवसात सोयाबीन, कापूस, भाजीपाला व फळपिकांवर विविध किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच वेळोवेळी निंबोळी अर्काच्या फवारण्या काढाव्या. प्रादुर्भाव होऊन तो नियंत्रीत करण्यासाठी लागणारा खर्च व नुकसान अधिक आहे. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आधिच नियोजनात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्काच्या फवारण्या प्राभावी ठरेल.
- डॉ. ए.के. सदावर्ते, मुख्य पीक संरक्षण अधिकारी, कीटकशास्त्र विभाग, डॉ.पंदेकृवि अकोला

 

हे ही वाचा : मूग, उडीद गेला अन् मसाला पिकाचा पर्याय खुला; ओवा, सोप, धन्याचे पीक देऊ शकते भरघोस उत्पन्न

 

या किडींचा वाढू शकतो प्रादुर्भाव
सोयाबीनवर हिरवी उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी, केसाळ अळी, शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो तर, कपाशीवर गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्या ढेकूण इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. इतर पिकांवरही विवध रस शोषण करणाऱ्या व पाणे खाणाऱ्या, झाड पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव राहू शकतो.
 

हे ही वाचा : येणारी अमावस्या कापूस उत्पादकांना भारी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Likely to increase the incidence of pests in Akola district