Akola Lok Sabha Election : अठरा तास उलटूनही मतदानाच्या अंतिम टक्केवारी प्रतिक्षाच; अकोला प्रशासनाचे चाललंय तरी काय?

Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा निवडणूक विभागाचे सामान्य निरिक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal

अकोला : दुसऱ्या टप्प्पयातील लोकसभा निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत अकोला लोकसभेसाठी मतदान होवून जवळपास १८ तासांचा कालावधी उलटला तरी मतदानाची टक्केवारी अद्याप अकोला जिल्हा प्रशासनाकडून जाहिर झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे नेमके चाललेय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला लोकसभा निवडणूक विभागाचे सामान्य निरिक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अकोला लोकसभा निवडणूकीसाठी शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तिनदा आकडेवारी जाहिर केली. पण ही आकडेवारी अंतिम नसून आणखी दोन तास लागू शकतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काल शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२.६९ टक्के एवढे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री ८ वाजता परत आकडेवारी जाहिर झाली. त्यात ५८ टक्के मतदान झाल्याचे सांगितले.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

त्यानंतर आज सकाळी परत वोटर टर्नआऊट ॲपवर ६१.७९ टक्के मतदान झाल्याचे दिसत आहे. शिवाय जिल्हा माहिती कार्यालयाने सुद्धा तीच आकडेवारी प्रसिद्धी माध्यमांना दिली. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आकडेवारी बोलायला तयार नाहीत. आणखी एक दोन तास अंतीम आकडेवारीसाठी लागू शकतात असे सांगण्यात आले. निवडणूक विभागाचे सामान्य निरिक्षक रामप्रतापसिंग जाडोन अकोल्यात आहेत. असे असतानाही १८ तास उलटले तरी मतदानाची टक्केवारी जाहिर न होणे ही चिंतेची बाब आहे.

Lok Sabha Election 2024
Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com