वि. प. निवडणूक : ‘वंचित’च्या गुगलीने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या

vanchit bahujan aghadi
vanchit bahujan aghadivanchit bahujan aghadi

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेतील सभापतिपदाच्या निवडणुकीतील राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना कोंडीत पकडण्यासाठी टाकलेल्या ‘गुगली’ने या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी लक्ष गाठण्यासाठी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया व भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरस आहे. कोणत्याही पक्षाकडे विजयी लक्ष्य गाठण्या एवढे मतदान नसल्याने मोठ्या संख्येने असलेले अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या मतदानावर दोन्ही उमेदवारांना अवलंबून राहावे लागणार आहे. अपक्षांना ‘अर्थपूर्ण’ मतदानासाठी आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही उमेदवार सर्वस्वपणाला लावणार आहेत. मात्र, प्रश्न आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेचा.

vanchit bahujan aghadi
TET प्रश्नपत्रिका हातात पडली... आणि पेपर फुटला!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ‘वंचित’ने या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार दिला नसला तरी सध्या हा पक्ष ‘ड्रायव्हिंग सिट’वर आहे. त्यामुळे ‘वंचित’ची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत वंचितने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित भूमिका स्पष्ट करण्याची ‘गुगली’ टाकल्याने अकोला-बुलडाणा-वाशीम प्राधिकारी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

जि. प. सभापती निवडणुकीचे पडसाद

जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण आणि विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तोंडघशी पडावे लागले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडीतील चारही घटक पक्षांची बांधलेली मोट व त्यामुळे भाजपने ऐनवेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकलेले मत, हे होते. हा पराभव जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ‘वंचित’ने या पक्षांना धडा शिकवीत आपले ‘अर्थ’ व ‘सत्ता’कारण सरळ करून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

vanchit bahujan aghadi
ओमिक्रॉनची दहशत : आयसीसीने विश्वचषक स्पर्धेचे सामने केले रद्द
विधान परिषद निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका हे ॲड. बाळासाहेब आंबेडकरच स्पष्ट करतील. वंचितला महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांकडून चर्चेची अपेक्षा आहे. त्यानंतरच वंचित आपली भूमिका स्पष्ट करेल.
- प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com