धक्कादायक! मायलेकींवर चोघांनी केला सामूहिक अत्याचार| Mass Atrocities | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

धक्कादायक! मायलेकींवर चोघांनी केला सामूहिक अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन (जि. बुलडाणा) : शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत ग्राम वसारी येथे मायलेकींवर ९ नोव्हेंबर रोजी रात्री अत्याचार झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सातही जणांना तातडीने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसारी येथील ३० वर्षीय महिला १३ वर्षीय मुलीसोबत टीनपत्राच्या घरात राहते. महिलेचा नवरा सोडून गेला असून, त्याने दुसरे लग्न केले आहे. महिला ९ नोव्हेंबर रोजी शेतात काम करून घरी आली. जेवण करून ती व मुलगी झोपले. रात्री अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास आवाज आल्याने तिला जाग आली. घरामागे राहणारा व्यक्ती महिलेच्या मुलीसोबत बळजबरीने अत्याचार करताना दिसला.

हेही वाचा: T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

जिवाच्या भीतीने आईने आरडाओरड केली नाही. तेवढ्यातच त्याच परिसरात राहणारा दुसरा व्यक्ती महिलेच्या घरात आला व महिलेसोबत अत्याचार केला. काही वेळाने तिसरा व्यक्ती महिलेच्या घरात गेला व महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर मिस्त्री नामक व्यक्ती आला व १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर सर्वजण निघून गेले.

अत्याचार करणारे जिवाने मारतील या भीतीने मायलेकी गप्प राहिल्या. १० नोव्हेंबरला महिलेने वडील व दोन भाऊ यांना घडलेल्या घटनेबाबत आपबिती सांगितली. वडील व भाऊ यांनी ‘तुझे तुकडे करून धरणात फेकून देतो’ अशी धमकी दिली. दुसऱ्या भावाने मायलेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडील, भाऊ यांनी महिलेला धमकी दिली की ‘तू याबाबत कोणाला काही सांगू नको, नाही तर तुला व तुझ्या पोरीला जिवाने मारून टाकील’. हतबल झालेल्या महिलेने मुलीसोबत शिरपूर पोलिस स्टेशन गाठून ११ नोव्हेंबर रोजी रात्री तक्रार दिली.

हेही वाचा: अमरावती : बंदसाठी दगडफेक; त्रिपुरा घटनेचा निषेध

घटनेची गंभीरतेने दखल घेऊन ठाणेदार सुनील वानखेडे, एपीआय जगदीश बांगर, संतोष पाईकराव, विनोद चव्हाण, गौरीशंकर तेलंगे, मनोज काकडे व मनोज ब्राह्मण यांनी घटनास्थळ गाठले व सातही आरोपींना अटक केली. महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी किशोर ना. सरोदे, नामा प. जाधव, गजानन ना. सरोदे व प्रवीण ज. रत्नपारखी मिस्त्री या चार जणांविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे वडील गोविंदा पवार, भाऊ शंकर पवार, चंद्रकांत पवार रा. वसारी या तिघांविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top