अकोला : मनपा निवडणुकीत काँग्रेसचा भार पश्चिमवरच!

अकोला पूर्वमध्ये काँग्रेसची पाटी कोरी; नेत्यांचीच निवडणुकीकडे पाठ
election
electionsakal

अकोला : महानगरपालिका निवडणुकीत भाजपनंतर (BJP)अकोल्यात सर्वांत मोठा पक्ष कायमच काँग्रेस राहिला आहे. यापूर्वी सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची संपूर्ण मतदार आतापर्यंत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावरच राहिली आहे. अकोला पूर्वमध्ये काँग्रेसची पाटी कोरी राहत असल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. अकोला पूर्वमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नेते राहत असतानाही हे नेते प्रत्यक्ष निवडणुकीकडे पाठ फिरवित असल्याने पक्षाची स्थिती कमकुवत असल्याची ओरडही काँग्रेसमधूनच होत आहे.

election
महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

अकोला मनपात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने पाच वर्षे काढले आहेत. सन २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपनंतर सर्वाधिक १३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. हे सर्व काँग्रेस नगरसेवक अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यातही उत्तर झोनमधून सर्वाधिक काँग्रेस सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे एकाच भागात काँग्रेस एकवटली जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे.(akola news)

election
बेळगाव : आंतरराज्य वाहतूक सुरु राहणार

दुसरीकडे अकोला पूर्वमध्ये मतदार असलेले काँग्रेसचे सर्वाधिक नेते आहेत. त्यात आजी-माजी जिल्हाध्यक्षांसह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांकडून महानगरपालिका निवडणुकीत केवळ मार्गदर्शकाची भूमिका निभावली जाते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस केवळ एकाच भागात मर्यादित होत असल्याचा सूर खुद्द काँग्रेसच्या अलिकडे मनपा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित बैठकांमध्ये उमटू लागला आहे.(municipal corporation election)

election
माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले ; प्रभाकर देशमुख

ज्येष्ठ नेत्यांना उतरावे लागणार निवडणूक रिंगणात

अकोला पश्चिममध्ये एकवटत असलेल्या काँग्रेसला अकोला पूर्वमध्ये चांगले दिवस हवे असतील तर या परिसरातील काँग्रेसच्या दिग्गजांना मानपान सोडून मनपाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरावे लागणार आहे. त्याशिवाय काँग्रेससाठी अकोला पूर्वमध्ये काँग्रेसचे खाते उघडणार आहे.

५८ पैकी १३ काँग्रेस नगरसेवक

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेचे २०१७ मध्ये साडे चौदा प्रभाग होते. त्यात एकूण ५८ नगरसेवक निवडून आलेत. या ५८ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. दुसकीकडे ग्रामीण व शहरी चेहरा असलेल्या अकोला पूर्व मतदारसंघात अकोला शहरातील साडेपाच प्रभाग येतात. यातून २२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी शिवसेनेचा एक व वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक निवडणूक आले आहेत. उर्वरित नगरसेवक भाजपचे असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच होती.

झोननिहाय असे होते प्रभाग

  • पूर्व झोन - सहा

  • पश्चिम झोन - पाच

  • उत्तर झोन - चार

  • दक्षिण झोन - पाच

मनपातील विद्यमान पक्ष स्थिती

  • भाजप ४८

  • काँग्रेस १३

  • शिवसेना ०८

  • राष्ट्रवादी काँग्रेस ०५

  • भारिप-बमसं (वंचित) ०३

  • एमआयएम ०१

  • अपक्ष ०२

  • एकूण ८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com