esakal | लग्नास नकार दिल्याने मुलीच्‍या काकाचा निर्घूण खून
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नास नकार दिल्याने मुलीच्‍या काकाचा निर्घूण खून

लग्नास नकार दिल्याने मुलीच्‍या काकाचा निर्घूण खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जा.) (जि. बुलडाणा) : लग्नाला नकार दिला म्हणून मुलीच्या काकाचा खून व वडिलास गंभीर जखमी केल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जळगाव जामोद येथे घडली. नूर खान समशेर खान असे मृताचे तर रसूल खान समशेर खान (रहिवासी जोहरीपुरा, जामोद) असे जखमीचे नाव आहे. तर शेख सद्दाम असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सय्यद अमीन सय्यद अफसर यांनी बुधवारी जळगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, रसूल खान समशेर खान (रा. जोहरीपुरा, जामोद) यांची मुलगी दहावीत शिकते. शेख सद्दाम हा मुलीला त्रास देत होता. सद्दामला मुलीच्या काकांनी दूर राहण्यास सांगितले होते. दुसरीकडे सद्दामचे वडील मुलीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घेऊन गेले होते. मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला होता. यामुळे सद्दाम संतापला होता. ‘तुम्ही मुलगी देत नाही, तर पळवून नेल्यानंतर द्याल का?’ असे सद्दाम दहा दिवसांपूर्वी म्हणाला होता.

हेही वाचा: चंद्रपूर : बल्लारपुरात पुन्हा टोळीयुद्ध, एकाची हत्या

यामुळे वडिलांनी भावाला बोलण्यासाठी घटनेच्या दिवशी बोलावले होते. यावेळीही मुलीचे वडील व काकांनी लग्नास नकार दिला. यामुळे चिडलेल्या सद्दामने नूरखान यास मारहाण केली. शेख सद्दामच्या घरासमोर रात्री साडेसातच्या सुमारास नूरखानच्या डोक्यावर शेख बशीर याने लोखंडी रॉडने वार केला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांना सोडविण्यासाठी भाऊ जखमी रसूल खान समशेर खान आले असता आरोपी सद्दामने पोटावर, मांडीवर आणि डोक्यात वार करून मारहाण केली. शेख नजीर याने नूरखानच्या पायावर काठीने मारहाण केली. त्यावेळी तिथे हजर असलेले शेख इम्रान, मोहम्मद निशाद, शेख मुफिज़, रफिक खान, शेख असलम, ईस्माईल खान यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नुरखान यांना मृत घोषित केले. तसेच जखमी रसूल खान समशेर खान यांच्यावर प्राथमिक उपचार करून खामगाव येथे रेफर करण्यात आले.

हेही वाचा: अमरावती कारागृहातील वृद्ध बंदीचा मृत्यू

घटनास्थळी चोख पोलिस बंदोबस्त

घटनास्थळी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शेख सद्दाम ऊर्फ सरदार शेख नजीर, शेख नजीर शेख कदीर, शेख जुनेद ऊर्फ बशीर शेख नजीर, शेख जुबेर शेख नजीर या चारही आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडेसह बीट जमदार उमेश शेगोकार करीत आहे.

loading image
go to top