esakal | सकाळपासून गावात छावणीचे स्वरूप; तणावपूर्ण वातावरणात अविश्वास ठरावावर मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

The nature of the camp in the village since morning at Akola Marathi News Telhara; Sarpanch votes on no-confidence motion in tense atmosphere

तणावपूर्ण वातावरणात सरपंच अविश्वास ठरावावर मतदान
गाडेगावात सरपंचच्या बाजूने ७२१ तर विरोधात ४४० मतदान

सकाळपासून गावात छावणीचे स्वरूप; तणावपूर्ण वातावरणात सरपंच अविश्वास ठरावावर मतदान


तेल्हारा (जि.अकोला) :  राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गाडेगाव येथिल सरपंच प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे वरील अविश्वास प्रस्तावामध्ये शनिवारी (ता.२६) झालेल्या ग्रामसभेच्या निवडणुकीमध्ये सरपंचांच्या बाजूने ७२१ एवढे मतदान झाले असून, विरोधात ४४० एवढे मतदान झाले

सकाळपासून गावात छावणीचे स्वरूप; तणावपूर्ण वातावरणात अविश्वास ठरावावर मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि.अकोला) :  राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गाडेगाव येथिल सरपंच प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे वरील अविश्वास प्रस्तावामध्ये शनिवारी (ता.२६) झालेल्या ग्रामसभेच्या निवडणुकीमध्ये सरपंचांच्या बाजूने ७२१ एवढे मतदान झाले असून, विरोधात ४४० एवढे मतदान झाले

८४ मतदान अवैद्य ठरविण्यात आले. २८१ मतांच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव बारगडला. निवडणुकीदरम्यान गाडेगावात प्रचंड तनाव दिसून आला. सकाळपासून गावात छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून आले.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत सरपंच प्रमोद वाकोडे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आला असता, शासन निर्णयाप्रमाणे गाडेगाव ग्रामपंचायत मध्ये शनिवारी (ता.२६) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये गावातील महिला-पुरुषांनी एकूण १२४५ मतदान झाले.

त्यापैकी सरपंचाच्या बाजूने ७२१ एवढे तर विरोधामध्ये ४४० एवढे मतदान झाले. एकूण मतदान २७५४ होते. त्यापैकी १२४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेदरम्यान एक अल्पवयीन मुलगा स्वतः मतदानाला आल्याचे दिसून आले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला संबंधित कर्मचाऱ्यांनी थांबविले.

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

तालुक्यातील गाडेगाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्यामुळे तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके यांनी राखीव पोलिस दलाची १० ची तुकडी, तेल्हारा पोलिस स्टेशनचे कर्मचारी, हिवरखेड मधील सात पोलिस कर्मचारी, दहिहंडा मधील पाच पोलिस कर्मचारी, १५ होमगार्ड एवढा मोठा ताफा गाडेगावात तैनात होता. यावरून गावात किती तणावपूर्ण वातावरण होते हे दिसून आले.

हेही वाचा - नक्षलवादी होणाचा विचार येणे, हे तर राज्यकर्त्यांचे अपयश, सरकारला लाज कशी वाटत नाही?- रविकांत तुपकर

सकाळपासून गावाला छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रियेदरम्यान महिलांना सर्व प्रथम मतदान करू देण्यात आले. त्यानंतर पुरुषांनी मतदान केले.मतदान प्रक्रिया दरम्यान सकाळी महिलांची मोठी गर्दी झाली असता, काही महिला परत गेल्या होत्या. त्यानंतर परत आल्या असता प्रशासनाने त्यांना मतदान वेळेचे बंधन असल्यामुळे येण्यास रोखले. सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगडल्याचे जाहिर होताच सरपंच समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती स्थगिती
एक महिन्यांपूर्वी गाडेगावचे सरपंच प्रमोद वाकोडे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला होता. त्याविरुद्ध सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती दिली. त्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे यापूर्वी सरपंच जनतेतून निवडून गेल्यामुळे सरपंचावर अविश्वास ठराव हा ग्रामसभेतून घेतल्या जावा असे निर्देश आल्यामुळे शनिवारी (ता.२६) अविश्वास प्रस्ताव बाबत ग्रामसभा घेण्यात आली असता २८१ मतांच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव बारगडला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image