सर्वच याचिका फेटाळल्या; आता मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीची प्रतिक्षा

सर्वच याचिका फेटाळल्या; आता मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीची प्रतिक्षा


वाशीम ः जिल्हा परिषद निवडणुकीत (Zilha Parishad Election) इतर मागास प्रवर्गातील आरक्षण (Reservation) ५० टक्केच्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार ? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. १४ सदस्य अपात्र झाल्याने जिल्हा परिषदेचे संख्याबळ ३८ वर गेले असून, या सदस्यांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या कसोटीवर कसे टिकणार? हा प्रश्न आहे. (Now waiting for Washim Zilla Parishad elections)

सर्वच याचिका फेटाळल्या; आता मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीची प्रतिक्षा
प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा

वाशीम जिल्हा परिषदमध्ये गतवर्षी सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती, मात्र निवडणुकीपूर्वीच विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय प्रलंबित असताना निवडणूक लागली होती. निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक प्रक्रीया पार पाडली जात असताना इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकडून न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून निवडणूक लढविण्याचे शपथपत्र घेण्यात आले होते. ता. ४ मार्च २०२१ ला सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतिम निर्णय देत वाशीम जिल्हा परिषदेतील इतर मागास प्रवर्गातील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाने वाशीम जिल्हा परिषदेतील सदस्यसंख्या ३८ वर आली होती. दोन सभापती व जिल्हा परिषद अध्यक्षांना पदमुक्त व्हावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. इतर जिल्ह्यातूनही याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने आता निवडणूक घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा कधी करणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

सर्वच याचिका फेटाळल्या; आता मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीची प्रतिक्षा
आजपासून वर्दळ; बाजार दुपारी दोन वाजेपर्यंत अनलॉक!

संख्याबळाची तांत्रिक अडचण
जिल्हा परिषदेतील संख्याबळ ५२ आहे. आता १४ सदस्य अपात्र घोषित झाल्याने जिल्हा परिषदेचे संख्याबळ ३८ वर आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपाध्यक्षांकडे प्रभारी आहे. एका सभापतीचे पद रिक्त आहे. या परिस्थितीत या संख्याबळावर घेतलेले निर्णय तांत्रिक अडचणीत येऊ शकतात. जिल्हा परिषद अध्यक्षपद किती दिवस प्रभारी ठेवता येते याबाबतही सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जोर चढला आहे.

प्रक्रीया पूर्ण, घोषणा बाकी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे. कोरोनाची आडकाठी या निवडणुकीत येणार नसल्याचा तर्क असून, जुलै महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संपादन - विवेक मेतकर

Now waiting for Washim Zilla Parishad elections

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com