नांदुरा तालुक्‍याची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने; पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली सोळाशे पार

The number of corona positive patients is increasing in Nandura taluka
The number of corona positive patients is increasing in Nandura taluka

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्याच्या मानाने कमी होता. कोरोना आटोक्यात असल्याचेही चित्र तालुक्यात दिसत असतानाच मार्च महिन्यात हे चित्र बदलले असून १६ दिवसातच ४७५ रुग्ण आढळल्याने तालुक्याची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू असल्याने चिंता वाढली आहे. 

गेल्या १६ दिवसात तालुक्यात ४७५ रुग्णांची नोंद झाल्याने संक्रमणाचा धोका वाढत असल्याने वेळीच सावध होण्याकरिता जनतेने जिल्ह्यात लागू झालेली संचारबंदी ओळखून गर्दी टाळण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. १६ मार्चपर्यंत संपूर्ण तालुक्यात १३ हजार १७२ पेक्षा अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून १ हजार ६६१ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक नांदुरा शहरातील १०३८ तर ग्रामीण भागातील ६२३ रुग्णांचा समावेश असून १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१३ इतकी असून आतापर्यंत १ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

नांदुरा तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मागील वर्षीच्या २० मे रोजी अलमपूर येथे आढळला होता. तेव्हापासून आज जवळपास दहा महिन्याच्या कालावधीनंतर तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६६१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ग्रामीण भाग ते शहर असा कोरोना संक्रमणाचा प्रवास असून सर्वाधिक झळ ही शहराला त्यातल्या त्यात शासकीय कार्यालयाला बसली आहे. जनतेशी निगडीत असलेल्या कृषी व पंचायत विभागात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने हे विभाग काही दिवस अक्षरशः बंद ठेवावे लागले होते. 

गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली असल्याने संचारबंदीचे आदेश देण्यात आले असतानाच नांदुरा तालुक्यात रुग्णसंख्येवर आवर बसल्याची सुरुवातीला स्थिती होती. नंतर मात्र जसजसे जिल्ह्यात रुग्ण वाढत गेले त्याची झळ तालुक्यालाही बसत गेली. मार्च महिना लागत नाही तोच रुग्णाच्या संख्येत एकदम वाढ होऊन १६ दिवसातच ही संख्या ४७५ झाल्याने तालुक्याची पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याची आकडेवारी पाहता संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीनुसार वेळ ठरवून लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसात रुग्णवाढीचा दर वाढत असल्याने सर्वांनी सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क व वेळोवेळी हात स्वच्छ साबणाने धुण्यासोबतच गर्दी टाळून स्वतःची काळजी घेऊन प्रशासनाला मदत करावी. 
- डॉ.अभिलाष खंडारे,तालुका वैद्यकीय अधिकारी, नांदुरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com