esakal | तालुकास्तरावर होणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट

बोलून बातमी शोधा

तालुकास्तरावर होणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट
तालुकास्तरावर होणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : राज्यात रेमडेसिवीरचा तुडवडा जाणवत असून रुग्ण दगावत आहेत. या वर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हटले, कि रेमडेसिवीरचा पुरवठा 21 एप्रिलनंतर सुरळीत होईल. तसेच भविष्यात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी छोटेछोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा: बापरे! टेस्ट शिवाय ट्रीटमेंट, रेमडेसिव्हिअरचाही वापर

राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मात्र आपण कर्नाटक, आंधप्रदेश, गुजरात इथून ऑक्सिजन घेत आहोत. पुढे रुग्ण असेच वाढत राहिले तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यासाठी आजच मंजुरी दिली आहे त्यामुळे आपली ऑक्सिजनची गरज भागणार आहे.

हेही वाचा: 'नितेश राणे हे बेडकांचे पिल्लू आहे', आमदार पुन्हा बरसले

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहेकर आणि सिंदखेडराजा इथे या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांटसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची गरज भागण्यास मदत होईल, असं डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर