लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष, रुग्ण वाऱ्यावर, मुहूर्त निघेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patients in the area with Borgaon Manju in Covid

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष, रुग्ण वाऱ्यावर, मुहूर्त निघेना!


अकोला ः अकोला (Akola) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत बोरगाव मंजू (Borgaon Manju) . तीस हजार लोकसंख्येच्या गावाला जवळपास ३० ते ४० खेडी जोडलेली. नागरिकांच्या आरोग्याच्या (Health) दृष्टिकोनातून येथे सन २०१५ साली ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी ११.४० कोटीचा निधी शासनाने मंजूर केला. जागा आहे, निधी आहे, पण काम करण्याची इच्छाशक्ती नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यासाठीच्या आधुनिक केंद्राचे आजही भिजत घोंगडे आहे. (Patients in the area with Borgaon Manju in Covid)
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने बोरगाव मंजू येथील नागरिकांनी वारंवार या विषयी पाठपुरावा केला. निवेदनंही दिली. बोरगाव मंजू येथील नव्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम त्वरित सुरू करावे यासाठी विनंती केली. सरतेशेवटी संतापही व्यक्त केला; मात्र पालथ्या घागरीवर पाणीच.

हेही वाचा: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय


सहा वर्षांपासून तांत्रिक अडचणीचे घोंगडे भिजतच
सन २०१५ साली ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम मंजूर झाले. त्यानंतर उद्‍भवलेल्या तांत्रिक कारणामुळे गत सहा वर्षांपासून रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले आहे. ३० खाटाच्या इमारतीचा प्रश्न सहा वर्षांपासून सोडविता आला नाही. ग्रामपंचायतीने जागा दिली, पण ती ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक तेवढी नसल्याने अपुरी पडत आहे. त्यामुळे तांत्रिक बाजू तपासून नवीन पद्धतीने इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार बांधकामाचा मुहूर्त ता.१६ सप्टेंबर २०१५ रोजी ठरला होता. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला जुनी इमारत पाडण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून पत्रही दिले होते.

हेही वाचा: ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!


आधी जागा, नंतर निधीची अडचण
जागा उपलब्ध करून दिली, अपुऱ्या जागेत तांत्रिक बाजू तपासून नवीन पद्धीतने इमारत बांधण्याची तयारी झाली आणि पुन्हा घोडे अडले. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ११.४० कोटीचा निधी अंदाज पत्रक व आराखड्यानुसार अपुरा पडत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला कळविले आणि इमारत बांधकाम मागे पडले ते आजपर्यंत सुरूच होऊ शकले नाही.

हेही वाचा: जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव

...तर कोविडमध्ये उपायोगी पडली असती इमारत
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासन, शासन व लोकप्रतिनिधींमध्ये असलेली अनास्था आज नागरिकांच्या जीवावर उठली आहे. बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुगाणालयाच्या इमारतीचे काम वेळेत सुरू झाले असते तर कोविड सारख्या महामारीत बोरगाव मंजू परिसरातील नागरिकांसाठी उपचाराकरिता हे ग्रामीण रुग्णालय कामी आले असते. बोरगाव मंजू व परिसरातील अनेक नागरिक आज कोविड आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. त्यांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही स्थिती भविष्यात वारंवार उद्‍भवणार, असे भाकित आरोग्य क्षेत्रातील तज्ञ वारंवार वर्तवित आहेत. त्यामुळे या जीवघेण्या आजारातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामीण भागात मंजूर झालेली रुग्णालयांची कामे तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!


डॉ. दशरथ भांडे मंत्री असताना ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती. आता पुन्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव प्रदीव व्यास यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्या सुविधा मिळाव्यात यासाठी बोरगाव मंजू ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे यासाठी मंत्रालयात पुन्हा प्रस्ताव पाठविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- गजानन देशमुख, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष, बोरगाव मंजू

Patients in the area with Borgaon Manju in Covid

loading image
go to top