अकोला : ९५ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccinate
अकोला : ९५ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन

अकोला : ९५ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन

अकोला : जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आतापर्यंत आढळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क असून यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ३१) आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत दुसऱ्या डोसच्या लसीकरणाची गती वाढवणे तसेच येत्या सोमवार (ता. ३ जानेवारी) पासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. जिल्ह्यात या वयोगटातील ९५ हजार लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.(vaccination of students)

हेही वाचा: पुणे : मुलांच्या लसीकरणासाठी आता ४० केंद्र

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मनीष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटणकर, डॉ. मनीषा ठग तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: इस्लामपूर नगरपालिकेची ३ जानेवारीची सभा रद्दचे निर्देश!

ऑक्सिजन; व्हेंटीलेटर्सच्या स्थितीचा आढावा

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड चाचण्या पूर्वक्षमतेने करण्यात याव्यात. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक रुग्णालये येथे चाचणी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व सज्जता असल्याचे नियोजन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात संभाव्य लाट आल्यास करावयाचे रुग्ण उपचाराचे व्यवस्थापन, आवश्यकता भासल्यास ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स, अतिदक्षता विभाग सुविधा याबाबत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.

असे आहे नियोजन

  • ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील (२००७ पूर्वी जन्मलेले) विद्यार्थी, मुला मुलींचे लसीकरण करण्यासाठी नियोजन आरोग्य विभागने केले आहे. त्यानुसार, ग्रामीण भागात ६० हजार तर शहरी भागात ३५ हजार असे एकूण ९५ हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.

  • जिल्ह्यात बाहेरगावचे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले असतात, त्यामुळे यापेक्षा अधिक म्हणजेच एक लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

  • ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३९५ व्यक्ती विदेशातून आले आहेत. त्यापैकी ७४ जण अद्यापही संपर्कात आलेले नसल्याने त्यांचा तपास पोलिसांनी करावा,असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top