
इस्लामपूर नगरपालिकेची ३ जानेवारीची सभा रद्दचे निर्देश!
इस्लामपूर : नगरपालिकेत येत्या तीन तारखेला बोलावण्यात आलेली सभा बेकायदेशीर असल्याने ती रद्द करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत तक्रार केली होती. त्यावर आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिला.(Instructions to cancel January 3 meeting of Islampur Municipality)
हेही वाचा: हिंगोली येथील एनटीसीमध्ये पोलिसांच्या छाप्यात तीन लाख ५० हजाराचा गुटखा जप्त
इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करण्यासंदर्भात शिवसेना(Shiv Sena) आक्रमक असून आनंदराव पवार यांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा ही सभा बोलावण्यात आली होती. त्यानुसार तीन जानेवारीला सभा घेण्याची नोटीस काढण्यात आली होती. २७ डिसेंबरला झालेल्या नगरपालिकेच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी दांडी मारल्याने ही सभा गणपूर्तीअभावी रद्द करावी लागली होती. सात दिवसांची मुदत पूर्ण झाल्याशिवाय दुसरी सभा घेता येत नाही, सदस्यांना किमान सात दिवस आधी नोटीस द्यावी लागते. त्या तारखेपासून सभेच्या तीन तारखेपर्यंत सात दिवस पूर्ण होत नसल्याने ही सभाच बेकायदेशीर आहे, असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला होता.
हेही वाचा: पुणे : मुलांच्या लसीकरणासाठी आता ४० केंद्र
ईश्वरपूर नामकरण विषयाबरोबरच अन्य विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. कायद्यानुसार सात दिवसांच्या अटींची पूर्तता होणार नसल्याने या सभेचा विषय निकाली निघाला आहे. दरम्यान स्थायी समितीचीही बैठक बोलावण्यात आली होती. कायद्यानुसार ही बैठक होऊ शकते, परंतु या बैठकीलाही गणपूर्तीचा विषय आडवा येऊ शकतो. दहापैकी पाच सदस्य हजर राहणे आवश्यक आहेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक या बैठकीला हजर राहण्याची शक्यता कमी असल्याने बी बैठकही होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
४ जानेवारी पासून प्रशासक!
चार जानेवारीपासून इस्लामपूर नगरपालिकेत विद्यमान पदाधिकाऱ्यांची सत्ता संपुष्टात येत असून त्यानंतरचा कारभार प्रशासकाकडे जात आहे. मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी येत आहे.
Web Title: Instructions To Cancel January 3 Meeting Of Islampur Municipality
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..