esakal | ऐका हो ऐका...शेत बांधावर लागणार आता पैशाचे झाडं
sakal

बोलून बातमी शोधा

Tree.jpg

आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये झाडाला पैसे लागतात, झाड पैसे देतं, असं लहानपणी ऐकल असेल. पण ही फक्त एक मनोरंजन कथाच, हे आता सर्वांना कळून चुकलं आहे. मात्र आताही कोणी सांगत असेल, झाड पैसे देत तर, कोणाचा विश्वास बसेल काय? परंतु, सामाजिक वनीकरण विभागाच्या ‘शेती, बांधावर वृक्ष लागवड’ योजनेतून ही कल्पना सत्यात उतरत असताना दिसत आहे.

ऐका हो ऐका...शेत बांधावर लागणार आता पैशाचे झाडं

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : ‘रोपही देऊ, येणारा खर्चही देऊ, तुम्ही फक्त शेती बांधावर रोपं लावा, ती जगवा आणि त्यापासून आर्थिक नफाही तुम्हीच मिळवा. जेवढी झाडे जगवाल तेवढे अनुदानही देऊ’. अशी कमालीची योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत वन विभागाच्या समाजिक वनीकरण शाखेमार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत लागवड पूर्व ते तीन वर्षाच्या कामाचा आढावा घेऊन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.

हे ही वाचा : टोळधाडीची अनिश्चित वाट, गुलाबी बोंडअळीचा मात्र धोका दाट

वृक्षसंवंर्धनासोबतच सुटेल अर्थार्जनाचा प्रश्न
योजनेंतर्गत वृक्ष लागवडीचा कालावधी 1 जून ते 30 नोव्हेंबरपर्यंत निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज स्वीकारणे सुरू असून, अनेकजण योजनेंतर्गत रोपांसाठी संपर्क साधला आहे. या योजनेतून वृक्ष संवंर्धनासोबतच मजूरांना रोजगार, शेतकऱ्यांना अनुदान व वृक्षांपासून भविष्यात चांगले उत्पन्न सुद्धा प्राप्त होईल.
- विजय माने, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, अकोला

हे ही वाचा : होती पावसाची वाट, वाहले घामाचे पाट...या जिल्ह्यात मृग नक्षत्राची सुरुवात कोरडीच

यांना प्राधान्य
योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 खालील लाभार्थी, कृषी कर्जमाफी व कर्ज सहाय्य योजना 2008 यामध्ये व्याख्या केलेले लहान आणि सीमांतभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

हे ही वाचा : भाववाढीचा भार अन् वजनातही मार...महाबीजची सोयाबीन बॅग किमतीने महाग वजनाने हलकी

लाभधारक निवड व अहर्ता पद्धती

  • मग्रारोहयोसाठी जॉबकार्डधारक व नमुद कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • इच्छूक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक.
  • लाभार्थ्याने सातबारा व आठ अ चे उतारे अर्जासोबत जोडावे.
  • लाभार्थ्यांने अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करावा.
  • एका गावामध्ये असलेल्या शेतकऱ्यांचा गट एकत्रितपणे स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येईल.
  • वृक्ष लागवडीचे संवर्धन व जोपासना करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.
  • बागायत वृक्ष पिकांचे कमीत कमी 90 टक्के आणि कोरडवाहू 75 टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना अनुदान देय राहील.

हे ही वाचा : राज्यशासनाचा ‘हिरवा’ कंदील...आरबीआयचा मात्र दिवा ‘लाल’

वृक्षांची निवड व आर्थिक लाभ
योजनेंतर्गत लागवडीसाठी साग, चंदन, खाया, बांबू, निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जून, सिताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू, फणस, ताड, सिंदी, सुरु, शिवण, शेवगा, हादगा, कडीपत्ता, महारुख, मॅन्जियम, मेलिया डुबिया, कोकम, करवंद, तूती इत्यादीचा समावेश असेल. या प्रजातिच्या 100 रोपांसाठी लागवडीपूर्व ते तृतीय वर्षापर्यंत 56,715 रुपयांचे नियोजन असून, निलगीरी, सुबाभूळ इत्यादी प्रजातीसाठी प्रतिहेक्टर 2500 रोपांसाठी एक लाख 40 हजार 540 रुपये देय राहतील.

loading image
go to top