
एमआयडीसी वाहतूक नगरातील एमआयडीसी प्रशासनाच्या ताब्यातील भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करून विकणाऱ्या मो. इब्राहिम मो. अजीज (रा. मुजफ्फरनगर) नामक दलालाला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या भूखंड घोटाळ्यातील बनावट दस्तऐवज तयार करणारा ॲड. राजेश पांचोली आणि त्याचा भाऊ यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.
अकोला : एमआयडीसी वाहतूक नगरातील एमआयडीसी प्रशासनाच्या ताब्यातील भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करून विकणाऱ्या मो. इब्राहिम मो. अजीज (रा. मुजफ्फरनगर) नामक दलालाला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या भूखंड घोटाळ्यातील बनावट दस्तऐवज तयार करणारा ॲड. राजेश पांचोली आणि त्याचा भाऊ यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, अकोला एमआयडीसी ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनवून, शासकीय प्लॉट विकण्यात आला होता. या भूखंडाचे बनावट कागदपत्रे ऑगस्ट २०१७ मध्ये तयार करून, डिसेंबर २०१७ मध्ये अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयाला आग लावून पुरावे नष्ट करण्यात आले होते. हेही वाचा - ‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’ या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी प्लॉट ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश काबरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई (अंधेरी) येथे केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. मंगळवार, ता. ४ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आलेल्या मो.इब्राहिम मो.अजिज याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय सोनोने करीत आहेत. हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा चौकशीतून पितळ उघडे हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला दोषी कर्चमारी निलंबित (संपादन - विवेक मेतकर) |
|||