‘प्रभात’ची ‘पलक’ सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर

प्रभात किड्स स्कूलची बॉक्सर खेळाडू पलक झामरे अंतिम सामन्यात थाटात प्रवेश
Prabhat Kids school boxer Palak
Prabhat Kids school boxer Palak sakal

अकाेला : शहरातील प्रभात किड्स स्कूलची बॉक्सर खेळाडू पलक झामरे हिने अमन (जार्डन) येथे सुरू असलेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियन बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना ४८ किलो वजन गटात ता. ८ मार्च रोजी झालेल्या उपांत्य सामन्यात कजाकिस्तानच्या खेळाडूवर दणदणीत विजय मिळवून अंतिम सामन्यात थाटात प्रवेश केला असून, ता. १४ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम समान्यात विजय मिळवून सुवर्ण पदक पटकावे अशी अपेक्षा देशासह अकोलावसियांकडून केल्या जात आहेत.

उपांत्य सामन्यात पलकने कजाकिस्तानची बॉक्सर गॉकर झारडेन हिचा ०/५ अशा फरकाने पराभव केला. प्रभात किड्स स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या पलकने गत वर्षी रायगड जिल्हात झालेल्या नवव्या सब ज्युनिअर राज्य बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत आणि हरियाणातील रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकावले होते. प्राचार्य सतीषचंद्र भट, प्रभातचे बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल वानखडे यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पलकचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com