Prime Minister Poshan Shakti : विद्यार्थ्याना मिळणार कोरडा शिधा ; शिक्षण विभागाचे आदेश

वाढत्या उष्णतामानामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूट दिलेली आहे. त्यामुळे त्यांना दिला जाणारा शिधा आता कोरडया स्वरुपात देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
Prime Minister Poshan Shakti
Prime Minister Poshan Shaktisakal

संग्रामपूर, (बुलढाणा) : वाढत्या उष्णतामानामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूट दिलेली आहे. त्यामुळे त्यांना दिला जाणारा शिधा आता कोरडया स्वरुपात देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना कोरडा शिधा वाटप करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.

याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले की, सध्या तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांत उपस्थित राहण्याबाबत सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून २२ एप्रिलपासून सवलत देण्यात आली आहे. शाळेमधील विद्यार्थ्याना २ मे पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.

२२ एप्रिलपासुन उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्याना आहार शिजवुन देण्यात यावा व त्याची माहिती सरल प्रणालीमध्ये दैनंदिन नोंद करण्यात यावी. जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार नाहीत त्या पात्र विद्यार्थ्याना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनासाठी नियमानुसार देय असलेला तांदूळ व धान्य आदी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्यात यावा.

ज्या विद्यार्थ्याना कोरडा शिधा वाटप करण्यात आला आहे त्या विद्यार्थ्याची ऑफलाईन माहिती तालुकास्तरावर संकलित करण्यात यावी. तथापि तालुकास्तरीय क्षेत्रिय अधिकारी यांनी याबाबत आढावा घेऊन योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची खात्री करावी, असेही म्हटले आहे.

Prime Minister Poshan Shakti
Buldhana Weather Update: उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

शैक्षणिक सत्र २०२४-२५ सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासुन आहार मिळणे आवश्यक असल्याने व पुढील पुरवठा होईपर्यत किमान २० दिवस पुरेल एवढा तांदुळ व धान्य आदी माल शाळास्तरावर असणे आवश्यक आहे तसेच तांदुळ व धान्यादी माल सुस्थितीत ठेवण्यात यावा, असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर. खरात यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com